Homeताज्या बातम्या

वाढीव टप्पा अनुदानासाठी आझाद मैदानावरील आंदोलन तीव्र; बीड जिल्ह्यातील शिक्षकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन7 व 8 जुलैला राज्यव्यापी शाळा बंद; निर्णय न झाल्यास आमदार रोहित पवार आंदोलनात ठिय्या मांडणार

राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान मंजूर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने 22 जूनपासून मुं

बीडच्या मल्टिस्टेट बँक घोटाळ्यातील पीडित ठेवीदारांना न्याय मिळवून देणार; आ.क्षीरसागर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीशिक्षकांच्या मागण्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन; तर बीडच्या पाणीप्रश्नासाठी जलसंपदा मंत्र्यांची घेतली भेट
’लाडकी बहीण, लाडका भाऊ… आता ’लाडके मायबाप’ व्हावेत!’- डॉ. वैद्यनांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार; ज्येष्ठ नागरिकांच्या 13 मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
अल्पसंख्याक संरक्षण कायद्यासाठी लोकसेना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामासमाजाला संरक्षण मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार



राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान मंजूर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने 22 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन रविवारी 16व्या दिवशीही सुरूच राहिले. आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी राज्यभरातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होत असून, बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनीही आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शिक्षक समन्वय संघाने केले आहे.
आंदोलनाच्या पुढील टप्प्यात 7 व 8 जुलै रोजी राज्यातील सर्व विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी शाळा बंद आंदोलनात सहभागी होत थेट मुंबईतील आझाद मैदान गाठावे, असे आवाहन समन्वय संघाने केले आहे. दरम्यान, 6 जुलै रोजी शासनाकडून वाढीव टप्पा अनुदानाबाबत महत्त्वाचा निर्णय अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, निर्णय न झाल्यास आमदार रोहित पवार हे शिक्षकांसोबत आझाद मैदानावर ठिय्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. समन्वय संघाने मागील वर्षीच्या आंदोलनाची आठवण करून दिली आहे. 8 व 9 जुलै 2025 रोजी आमदार रोहित पवार यांनी शिक्षकांसोबत आझाद मैदानावर आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर शासनाने वाढीव टप्पा अनुदानासाठी आर्थिक तरतूद केल्याचा दावा संघटनेने केला असून, यंदाही शिक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहिल्यास मागणी मान्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्या शिक्षकांनी सरकारला भावनिक साद घालत, आमच्या वयाचा, प्रदीर्घ सेवेचा आणि आमच्या कुटुंबाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वाढीव टप्पा अनुदान तात्काळ मंजूर करावे, अशी मागणी केली आहे या आंदोलनात बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी वैजनाथ चाटे, विजयसिंह शिंदे, जितेंद्र डोंगरे, पंकज कळसकर, मुक्ता आर्डे (मोटे), आत्माराम वाव्हळ, अरविंद सौंदळकर, शेख सर, प्रताप देशमुख, बाळासाहेब नागरगोजे, सुरेखा गायकवाड, दैवशाला मुंडे, भागवत यादव, दीपक गरूड, रविंद्र भुवन, अंकुश गवळी, दशरथ साबळे, चंद्रशेखर तौर, वैजिनाथ शिंदे, गोविंद आघाव आणि ज्ञानेश्वर मुंडे यांच्यासह संघटनेच्या सर्व जिल्हा व तालुका पदाधिकार्‍यांनी केले आहे.

COMMENTS