Homeताज्या बातम्या

पत्रकार अमजद शेख यांचा अनोखा वाढदिवस2,100 झाडांची लागवड करून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अमजद शेख यांनी वाढदिवसानिमित्त होणार्‍या अनावश्यक खर्चाला फाटा देत तब्बल 2,100 विविध

शाँर्ट सर्किटमुळे केसर आंब्याची बाग जळुन खाकआष्टी तालुक्यातील बीड सांगवी – गणगेवाडी येथील घटना; शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान
पेरणीचे साहित्य आणायला गेले अन घात झाला!भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; चुलत भाऊ गंभीर
राज्य गुणवत्ता यादीत 8 वा क्रमांक; कु. प्रांजल पोकळे शिष्यवृत्ती धारक



आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अमजद शेख यांनी वाढदिवसानिमित्त होणार्‍या अनावश्यक खर्चाला फाटा देत तब्बल 2,100 विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला.
आजकाल वाढदिवस म्हटला की केक कापणे, हार-तुरे, पुष्पगुच्छ, फेटे आणि जल्लोष असे चित्र पाहायला मिळते. मात्र, या प्रथेला छेद देत अमजद शेख यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपणाच्या माध्यमातून साजरा केला. वाढदिवसानिमित्त प्रत्येकाने किमान एक झाड लावावे, असे आवाहन त्यांनी यापूर्वीच केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मित्र, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपणात सहभाग घेतला. या उपक्रमात वड, पिंपळ, कडुनिंब तसेच विविध फळझाडांची लागवड करण्यात आली. केवळ झाडे लावून न थांबता ती जगवण्याचा आणि त्यांचे संगोपन करण्याचा संकल्पही अमजद शेख यांनी व्यक्त केला. वाढदिवसानिमित्त होणारा खर्च पर्यावरणासाठी उपयोगात आणत त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जबाबदारीचा प्रभावी संदेशही सर्वदूर पोहोचला. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.  यावेळी सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके, पत्रकार कासम शेख, नितीन कांबळे, शौकत पठाण, सिराज शेख, माने साहेब, धुळाजी लकडे, मा. स. राजेद्दहातोंडे, ड. नवनाथ शेकडे, तांदळे साहेब, संदीप वामन यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS