Homeताज्या बातम्या

नवनिर्वाचित वकिलांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

बीड जिल्हा वकील संघाचे ग्रंथ सचिव ड. सय्यद अजीम यांच्या पुढाकाराने एलएल.बी. उत्तीर्ण झालेल्या नवनिर्वाचित वकिलांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरण

बागेश्वर धामातील गवई!
निवडणूक प्रक्रिया : न्यायव्यवस्थेच्या हस्तक्षेपाची मागणी !
सुशिक्षित तरूणांमधील हिंसक प्रवृत्ती चिंताजनकमुख्यमंत्री फडणवीस : केतन अग्रवालची हत्या अनाकलनीय



बीड जिल्हा वकील संघाचे ग्रंथ सचिव ड. सय्यद अजीम यांच्या पुढाकाराने एलएल.बी. उत्तीर्ण झालेल्या नवनिर्वाचित वकिलांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विधी क्षेत्रात नव्याने प्रवेश करणार्‍या युवकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या यशाचा गौरव करणे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा सिटीझन वर्तमानपत्राचे संपादक शेख मुजीब भाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते तसेच अ‍ॅड. रईसभाई पठाण, अ‍ॅड. सय्यद साजेद, अ‍ॅड. शेख फिरोज, अ‍ॅड. शेख इम्रान, अ‍ॅड. शेख बिलाल, अ‍ॅड. सय्यद मिनहाज आणि नाहेद बागवान यांच्या हस्ते एलएल.बी. उत्तीर्ण झालेल्या नवनिर्वाचित वकिलांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित वकिलांना प्रामाणिकपणा, निष्ठा आणि सामाजिक बांधिलकी जपत न्यायव्यवस्थेची सेवा करण्याचे आवाहन केले. न्यायव्यवस्थेतील वकिलांची भूमिका समाजात न्याय, कायदा आणि लोकांचा विश्वास दृढ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तरुण वकिलांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करून न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा अधिक उंचावावी, असेही मत मान्यवरांनी व्यक्त केले. या गौरव सोहळ्यास बीड जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी, ज्येष्ठ विधिज्ञ, विधी क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने नवोदित वकिल उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

COMMENTS