Homeताज्या बातम्या

मतदार पडताळणी प्रक्रियेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा-अनिलदादा जगतापशिवसैनिकांनी घरोघरी पोहोचून मतदार पडताळणी पूर्ण करून घ्यावी : अनिलदादा जगताप यांच्या सूचना!

बीड, प्रतिनिधी- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार पडताळणी मोहिमेत प्रत्येक नागरिकाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आव

ठाकरेंच्या खासदारांने घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट
खा. ओमराजे निंबाळकर गेम फिरवणार ?उद्धव ठाकरेंनी फोन करून केली मनधरणी
बीडमध्ये शिवदुर्गा-शिवसंवाद दौर्‍याअंतर्गत महिला आघाडीची बैठक उत्साहात संपन्न!

बीड, प्रतिनिधी- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार पडताळणी मोहिमेत प्रत्येक नागरिकाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आवश्यक कागदपत्रे व माहिती वेळेत सादर करावी, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी केले आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मतदार पडताळणी मोहिमेत सक्रियपणे सहभागी होत असून, नागरिकांपर्यंत ही प्रक्रिया सुलभपणे पोहोचविण्याचे काम करत आहेत. नागरिकांनीही ही केवळ शासकीय प्रक्रिया न समजता आपली लोकशाहीप्रती असलेली राष्ट्रीय जबाबदारी म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन जगताप यांनी केले. येत्या काही दिवसांत तहसील कार्यालयात वारंवार फेर्‍या मारण्याची वेळ येऊ नये, यासाठी घरी येणार्‍या बीएलओ (इङज) अधिकार्‍यांना आवश्यक कागदपत्रे व भरलेले फॉर्म वेळेत उपलब्ध करून द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना अनिलदादा जगताप म्हणाले, आज थोडासा वेळ देऊन मतदार पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केल्यास उद्याच्या अनेक अडचणी सहज टाळता येतील. मतदार यादी अचूक आणि अद्ययावत ठेवणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. मतदार पडताळणी प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास नागरिकांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, बीड येथे संपर्क साधावा. नागरिकांच्या सेवेसाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक सदैव तत्पर असल्याचेही अनिलदादा जगताप यांनी स्पष्ट केले.

COMMENTS