Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 ‘तू माझ्याशी बोलली नाही, तर मी मरतो’, आता करतोय पश्चाताप !

मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला होता न्यायालयाने आरोपी स्वप्नील याला तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली

अकोला प्रतिनिधी - एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तू माझ्याशी बोल, तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर मी मरतो, अशी धमकी  देणाऱ्या युवकाविरू

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा लगतच्या भेंडवडे इनमदारवाडी येथे वृक्षतोड
बच्चू कडू हे नौटंकी छाप आमदार आहेत – आ. रवी राणा
ऑक्टोबर हिट आणि जागतिक तापमान! 

अकोला प्रतिनिधी – एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तू माझ्याशी बोल, तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर मी मरतो, अशी धमकी  देणाऱ्या युवकाविरूद्ध पीडित मुलीच्या तक्रारीवरून अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालला आहे . स्वप्नील वासुदेव बुधे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 17 वर्षीय मुलगी ही परीक्षा देण्याकरता सेंटरवर जात असताना आरोपी हा तिचा पाठलाग करत होता. तसेच ‘तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी मरतो,’ असे म्हणून तिला धमकी देत होता.दरम्यान, आरोपी स्वप्नील याच्या कृत्याला कंटाळून अखेर मुलीने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. घडलेल्या प्रकारानंतर कुटुंबीयांनी मुलीला सोबत घेऊन थेट बोरगाव मंजू पोलीस ठाणे गाठले. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी  आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी देताना आरोपी स्वप्नील याला तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

COMMENTS