देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आराध्यदैवत राजयोगी श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान शनिवारी (दि. ११ जुलै) होणार असून, यंदा दिंडीचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने वारकरी व भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.समस्त शहरवासीयांच्या प्रेरणेने व भक्तपरिवाराच्या सहकार्याने ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बाबा महाराज मोरे, सुभाष महाराज विधाटे, भगवान महाराज मोरे (देहकर), सोमनाथ महाराज माने आणि किशोर महाराज निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे नियोजन करण्यात आले आहे.शनिवार, ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता नगराध्यक्ष सत्यजित कदम व प्रिती कदम यांच्या हस्ते पालखी पूजन होणार असून,त्यानंतर प्रस्थान करणार आहे. दिंडी सोहळ्याची धुरा गेल्या वर्षापासून माजी नगरसेवक सचिन ढुस यांच्या खांद्यावर असून त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.रविवार, १२ जुलै रोजी सकाळी ८ वाजता राहुरी शहरात माजी खासदार बापूसाहेब तनपुरे व डॉ. उषाताई तनपुरे यांच्या हस्ते पालखी पूजन झाल्यानंतर दिंडी पुढील प्रवासास मार्गस्थ होणार आहे.या रौप्यमहोत्सवी दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक ह.भ.प. सिताराम ढुस यांच्या मार्गदर्शनाखाली श्री त्र्यंबकराज स्वामी शिक्षण व वारकरी संस्था, देवळाली प्रवरा तसेच व्यवस्थापन समिती परिश्रम घेत आहे.

COMMENTS