Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनोखा विवाह सोहळा; ‘सेवालया’ मधील एचआयव्ही संक्रमित पाच जोडप्यांचे शुभमंगल सावधान!

लातूर प्रतिनिधी - औसा तालुक्यातील हासेगाव येथे असलेल्या सेवालयातील एचआयव्ही संक्रमित पाच जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामध्ये झाला. शुभमंगल स

काँग्रेस सेवादलाचे संस्थापक डॉ. नारायण हार्डीकर यांना अभिवादन
मुक्रमाबाद येथे काँग्रेसचे जेलभरो आंदोलन
उस्माननगर येथे डॉ.बाबासाहेब  आंबेडकर जयंतीचे आयोजन

लातूर प्रतिनिधी – औसा तालुक्यातील हासेगाव येथे असलेल्या सेवालयातील एचआयव्ही संक्रमित पाच जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामध्ये झाला. शुभमंगल सावधान… सावधान… म्हणत अक्षता पडल्यानंतर पाच जोडप्यांनी बांधल्या रेशिमगाठी. हा विवाह सोहळा सेवालयातील हॅपी इंडियन व्हिलेजमध्ये मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
लातूरनजीक हासेगाव येथे प्रा. रवी बापटले यांनी 2007 मध्ये सेवालय नावाचा प्रकल्प सुरू केला. त्यावेळी सेवालयात दाखल झालेली बालके आता सज्ञान झाली आहेत. आतापर्यंत यातील 18 जोडप्यांचे विवाह झाले आहेत. यातील 7 जोडपी हॅपी इंडियन व्हिलेजवर राहत आहेत. त्यांना एचआयव्हीमुक्त मुलेही जन्मली आहेत. आज त्यांचे संसार सुखाने सुरू आहेत. आता अन्य एचआयव्ही संक्रमित पाच जोडप्यांचे विवाह शनिवारी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडले. यावेळी वधू आणि वरांचे पालक म्हणून डॉ. माया कुलकर्णी, भाजपचे संतोष मुक्ता, महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर लटपटे, मानवलोकचे अनिकेत लोहिया, प्रा. रूपाली गोरे, रामेश्वर बद्दर, डॉ. अशोक गाणू, दीपक बनसोडे, डॉ. हनुमंत किनीकर, प्रिया लातूरकर, डॉ. पवन चांडक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष माधव बावगे, डॉ. शैलजा बरुरे, हेमा राचमाले हे पालक म्हणून उपस्थित होते. या अनाथ मुलांना आशीर्वाद देण्यासाठी शांतेश्वर मुक्ता, सतीश जेवळ, मारुती मगर, खय्यूम शेख, शिवसेनेचे संतोष सोमवंशी, शिवकांत बापटले, राजकुमार महाशेट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. माधव बावगे यांनी पाचही नवदाम्पत्यांचे विवाह सत्यशोधकी पद्धतीने लावले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

COMMENTS