Homeताज्या बातम्या

डॉ. सलिम शेख यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. 

अहिल्यानगर : भयपट साहित्य, चित्रपट, मालिका व लघुपट यांच्या आंतरमाध्यमीय रूपांतरांचा सखोल अभ्यास करणाऱ्या डॉ. सलिम निसार शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने इंग्रजी विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. “A Compositional Exploration of the Horror Element with Reference to Intermedial Adaptation of the Select Works” या संशोधन प्रबंधासाठी ही प्रतिष्ठित पदवी देण्यात आली.’भीती’ ही मानवी मनाची सार्वत्रिक भावना. ती साहित्यातून चित्रपट, मालिका व लघुपटांपर्यंत कशी प्रवास करते, कसे बदलते, हे या संशोधनातून अधोरेखित झाले आहे. डॉ. शेख यांनी जगातील सात महान भयपट कृतींचा निवडक अभ्यास करत त्यांच्या मुद्रित व दृक-श्राव्य रूपांतरांची सूक्ष्म तुलना केली. यामध्ये फ्रँकेनस्टाइन, ड्रॅक्युला, द हॉन्टिंग ऑफ हिल हाऊस, द एक्सॉर्सिस्ट, द टर्न ऑफ द स्क्र्यू, द मंकीज पॉ आणि १४०८ या साहित्यकृतींचा समावेश आहे.हे संशोधन प्रो. डॉ. उमेश शिवराम जगदाळे (प्रोफेसर, इंग्रजी विभाग व पदव्युत्तर संशोधन केंद्र, संगमनेर महाविद्यालय) यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली साकार झाले. अंतिम तोंडी परीक्षेसाठी या प्रबंधाचे अधिकृत परीक्षक प्रो. डॉ. सी. चामुंडेश्वरी (रेवा युनिव्हर्सिटी, बंगळुरू) व प्राचार्य डॉ. संजय दिक्षीत (श्रीमंत भैयासाहेब राजेमाने कॉलेज, म्हसवड, जि. सातारा) यांची नियुक्ती करण्यात आली होती. या दोन्ही तज्ज्ञांनी प्रबंधाची सखोल तपासणी करून अत्यंत सकारात्मक अहवाल दिला. या उल्लेखनीय यशाबद्दल  जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, आ.सत्यजित तांबे, प्रो.डॉ.अनिंद्य स्याम चौधुरी, माजी आ. वैभव पिचड त्यांसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

महागाईचा भडका! केवळ ‘काटकसर’ सांगून भागणार नाही, सरकारने थेट कर कमी करावेत; डॉ. अजित नवले कडाडले!
वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल : मुख्यमंत्री फडणवीस; वैद्यकीय सेवेसाठी जायकाकडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता
नगर अर्बन बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकरपंत गारडे यांचे निधन

COMMENTS