Homeताज्या बातम्या

शिष्यवृत्ती परीक्षेत सावित्रीबाई फुले विद्यालयाचे यश  

देवळाली प्रवरा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली.इयत्ता आठवीतील किमया निलेश तरवडे हिने 284 गुण मिळवून अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम व राज्यात पाचवा क्रमांक मिळवला असून ती राष्ट्रीय शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. तसेच देवाशीष सुनील तोडमल (220), प्रथमेश अरुण राहिंज (216), श्रुती संदीप सिरसिम (214) व महिमा बाबासाहेब हराळे (212) यांनी ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती मिळवली. इयत्ता पाचवीतील अवधूत राजेंद्र भुजाडी याने 226 गुणांसह शिष्यवृत्ती प्राप्त केली. विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीसाठी तुकाराम जाधव, सविता ढोमसे व सविता गव्हाणे, तर इयत्ता आठवीसाठी गोकुळ ठाकूर, हलीम शेख, रविंद्र हरिश्चंद्रे व सचिन सिन्नरकर यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा विद्यालयात सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक अरुण तुपवहिरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वर्षीही अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवावे, असे आवाहन केले. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. विलास खर्चे, शिक्षण मंडळाचे सभापती डॉ. सातप्पा खरबडे व सचिव डॉ. महानंद माने यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे अभिनंदन केले.

अकोल्यात औषध फवारणी करावी
बीडची धग पोहचली राजधानी मुंबईत ; संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत काढला मोर्चा
कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन उत्साहात

COMMENTS