Homeताज्या बातम्या

एसआयआर अंतर्गत नांदेड दक्षिणमध्ये तहसीलदार संजय वारकड यांची चौफाळा भागात पाहणीप्रत्यक्ष गणना फॉर्म भरून डिजिटायझेशनचे प्रात्यक्षिक

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील चौफाळा परिसरात तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एसआयआर अंतर्गत अपर जिल्हाधिकार्‍यांची प्रत्यक्ष पाहणीमतदारांच्या घरी भेट देत फॉर्म भरून घेतले; डिजिटायझेशन प्रक्रियेचीही केली तपासणी
गोपाळचावडी व बाबुळगाव ग्रामपंचायतींचे वार्ड आरक्षण जाहीर
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त



विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील चौफाळा परिसरात तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड यांनी गुरुवारी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या.
यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्री. शेख, पर्यवेक्षक तसेच सुमारे 40 बीएलओ आणि सहाय्यक बीएलओ यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत गणना फॉर्मचे वितरण, संकलन, पडताळणी आणि प्राप्त फॉर्मचे मोबाईल पद्वारे तात्काळ डिजिटायझेशन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रत्येक टप्प्यावरील कामाचा आढावा घेऊन प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीनंतर तहसीलदार संजय वारकड यांनी चौफाळा येथील बालाजी कोकलवार यांच्या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष गणना फॉर्म भरून घेतला. त्यानंतर तो फॉर्म तत्काळ पवर डिजिटाईज करून बीएलओ व सहाय्यक बीएलओ यांना संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली. यामुळे क्षेत्रीय कर्मचार्‍यांना कामाची पद्धत अधिक स्पष्टपणे समजून घेण्यास मदत झाली. यावेळी बीएलओ मिनाक्षी शहा, पर्यवेक्षक विलास शृंगारपुतळे तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा विष्णुपुरी प्रकल्पाचे उपअभियंता श्री. शेख गुलाम उपस्थित होते. विशेष सखोल पुनरिक्षण (डखठ) कार्यक्रम प्रभावीपणे राबवून प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंदणी करणे आणि प्राप्त माहितीचे वेळेत डिजिटायझेशन पूर्ण करणे, यावर प्रशासनाचा विशेष भर असल्याचे यावेळी तहसीलदार संजय वारकड यांनी स्पष्ट केले.

COMMENTS