Homeताज्या बातम्या

विवेकानंद शाळेत मुलींना तायक्वांदो प्रशिक्षण

पाथर्डी : मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांना आत्मविश्वास, आत्मसंरक्षण आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने येथील विवेकानंद विद्या मंदिर येथे अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान व विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवी ते सातवीपर्यंतच्या मुलींसाठी तायक्वांदो प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विश्वस्त कुणाल आव्हाड यांच्या संकल्पनेतून तायक्वांदो प्रशिक्षण अभियान सुरू करण्यात आले.या उपक्रमामध्ये तायक्वांदो प्रशिक्षक पायल आसलकर यांच्या प्रशिक्षणातून मुलींना प्रत्यक्ष आत्मसंरक्षणाची तंत्रे, संकटसमयी योग्य निर्णय घेण्याची कला तसेच शिस्त, धैर्य आणि मानसिक बळ विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत प्रत्येक मुलीने आत्मसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज असून या प्रशिक्षणाद्वारे मुलींना केवळ स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता मिळणार नाही तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.या उपक्रमामध्ये नियमित सराव, तांत्रिक प्रशिक्षण, फिटनेस, व्यक्तिमत्त्व विकास आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक शारीरिक तयारी यांचाही समावेश असेल. त्यामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढून त्या प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे पुढे जाण्यास प्रवृत्त होतील. तायक्वांदो प्रशिक्षण शुभारंभप्रसंगी विश्वस्त कुणाल आव्हाड, तायक्वांदो प्रशिक्षक पायल आसलकर, समन्वयक ज्ञानेश्वर गायके, क्रीडा शिक्षक प्रमोद हंडाळ, गौरव दाणे तसेच विवेकानंद विद्या मंदिराचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

जायकवाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना लवकरच सुरू होणार; आमदार मोनिका राजळे यांच्याकडून कामाची पाहणी
तनपुरवाडी येथील नदीचे लोकवर्गणीतून खोलीकरण; सरकारी मदतीशिवाय ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम
प्रामाणिक विद्यार्थ्यांना परिस्थिती आडवी येत नाही : ढोले  

COMMENTS