Homeताज्या बातम्या

पशुसंवर्धन खात्याचे रिकामे भूखंड उद्योग उभारणीला द्यावेतकोपरगावात पशु दवाखाने सुरु करा ; आ. काळेंची विधिमंडळात मागणी

कोपरगाव : कोपरगावात रिकामे पडून असलेले पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे भुखंड उद्योग उभारण्यासाठी द्यावेत. तालुक्यातील जवळके, कुंभारी आणि शिरसगाव या गावात पशु दवाखाने सुरू करावेत.  या दोन महत्वाच्या मागण्या आमदार आशुतोष काळे यांनी विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान मांडल्या.ते म्हणाले,  कोपरगाव शहरात पशुसंवर्धन विभागाची ८६.४० हेक्टर आणि कॅटल ब्रीडिंग सेंटर फार्मच्या मालकीची १५.१९ हेक्टर अशी एकूण १०१.५९ हेक्टर जमिन पडून आहे. ही जागा उद्योग उभारणीसाठी हस्तांतरित करावी. त्याचा फायदा तालुका व जिल्ह्याला होईल. कोपरगावच्या दोन्ही बाजूने राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग गेले आहेत. स्वतंत्र रेल्वे स्टेशन आणि जवळच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि समृद्धी महामार्ग आहे.  या जमिनीवर कृषी, दूध,अन्न प्रक्रिया उद्योग उभारता येतील. याशिवाय मालाच्या साठवणुकीसाठी वेअरहाऊस आणि कोल्ड स्टोरेजची निर्मिती करता येईल.तालुक्यात ७४ हजार जनावरे आहेत आणि तुलनेत पशु दवाखाने कमी आहेत. जवळके, कुंभारी आणि शिरसगाव या गावात पशु दवाखाने सुरू करण्या बाबतच्या प्रस्तावांना तातडीने मंजूरी मिळावी. संवत्सर ग्रामीण रूग्णालयाचे काम सुरू आहे. तेथील  प्राथमिक आरोग्य केंद्र कोकमठाण या गावामध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मंजूर करावा असे काळे म्हणाले.कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कारण नसताना, तासंतास वीजपुरवठा खंडित होतो. एप्रिल मे महिन्यात मतदारसंघात अवकाळी पावसामुळे विजेचे खांब आणि वीज वाहिन्या कोलमडून पडल्या. शेतकयांचे आणि पशुपालकांचे हाल होत आहेत. दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी महावितरण कंपनीने कामगारांच्या टोळ्या वाढवाव्या आणि दुरुस्तीच्या कामाला गती द्यावी. – आ. आशुतोष काळे.

दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच देवपूजा : आ. काळे
वादळग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : आ.काळे
संस्था मोठी होणे हे संस्थापकांच्या कष्टाचे चीज; आमदार आशुतोष काळे यांचे प्रतिपादन

COMMENTS