Homeताज्या बातम्या

आ.अंतापूरकर यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; विशेष पोलीस संरक्षणाची सकल मातंग समाजाची मागणी

आरक्षण उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर संविधानिक आणि लोकशाही मार्गाने सातत्याने भूमिका मांडणारे देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आ.जितेश  अंतापूरकर त

उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरवादी समाज आक्रमक; ३० जूनला मुंबईत विधानसभेला घालणार घेराव
बीडचा लाँग मार्च पुणे जिल्ह्यात दाखलउपवर्गीकरण रद्दच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच
एससी आरक्षण उपवर्गीकरणावरून सरकारची कोंडीबदर समितीची अहवाल जाहीर करण्याची 27 आमदारांची मागणी ;



आरक्षण उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर संविधानिक आणि लोकशाही मार्गाने सातत्याने भूमिका मांडणारे देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आ.जितेश  अंतापूरकर तसेच त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचा दावा करत त्यांना तात्काळ विशेष पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र आणि जिल्हा पोलीस अधीक्षक, नांदेड यांना दिलेल्या निवेदनातून केली.
निवेदनात म्हटले आहे की, आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सातत्याने जनआंदोलन करत वंचित समाजाच्या हक्कासाठी आवाज उठवणारे आ. अंतापूरकर यांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण झाल्याची बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधीच्या सुरक्षेचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून लोकशाही, संविधान आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांच्या संरक्षणाशी संबंधित असल्याने शासनाने तातडीने योग्य ती सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी लोकशाही मार्गाने संघर्ष, संविधानाच्या चौकटीत न्याय हा निर्धार व्यक्त करत निवेदनाला जाहीर पाठिंबा दिला. या शिष्टमंडळात ड. गणेश (अण्णा) तादलापूरकर (समन्वयक, सकल मातंग समाज, महाराष्ट्र), प्रीतम गवले (जिल्हाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना), नागोराव आंबटवार, अंकुश गायकवाड (संस्थापक अध्यक्ष, ब्लॅक पँथर सामाजिक संघटना), कैलास भालेराव, माधव डोम्पले, दत्ता आईलवार, सूर्यकांत तादलापूरकर, संजय गोटमुखे, सुरेश कांबळे, स्वप्नील फुले (जिल्हाध्यक्ष, लहुजी छावा संघटना, नांदेड), निलेश तादलापूरकर, निवृत्ती गायकवाड, आनंदा अर्जुन वाघमारे, ईश्वर जाधव, भारत सरोदे, सुनीलकुमार मोघेकर, संभाजी कांबळे, आनंदा वाघमारे, मधुकर आईलवार, सचिन वाघमारे, यशवंत उप्पलवार, आकाश गवले यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS