Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहकारात परिवर्तन झाले तरच संस्थेची प्रगती : दिपक पवार

कुडाळ : कारखाना बचाव पॅनेलच्या सांगता सभेवेळी बोलताना दिपक पवार. सातारा / प्रतिनिधी : कारखाना स्थापनेपासून काही हंगाम वगळता कारखाना भाडेतत्वार चाल

फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांचा राजीनामा
जोड कालव्याची कामे तातडीने पूर्ण करा; विशेष बैठक लावून कालव्यांच्या भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी लावा : पालकमंत्री
धारेश्‍वर दिवशी येथे गाईचे ढोहाळे जेवन कार्यक्रम थाटामाटात

सातारा / प्रतिनिधी : कारखाना स्थापनेपासून काही हंगाम वगळता कारखाना भाडेतत्वार चालू आहे. कारखाना भाड्याने देताना सभासदांना विचारले नाही. माझ्यावर टीका करण्यापेक्षा सत्ताधार्‍यांनी कारखान्यासंदर्भात बोलावे. सहकारात परिवर्तन झाले तरच संस्थेची प्रगती होईल. जावलीचे आमदार म्हणतात मी सभासद नाही हे मान्य पण तुम्ही तरी कुठे सभासद आहात, असा सवाल करित आम्ही तालुक्यातील उस उत्पादक शेतकर्‍यांची गळचेपी थांबवण्यासाठी ही निवडणुक लढवत असून कारखाना बचाव पॅनेलचा विजय निश्‍चित आहे, असा ठाम विश्‍वास जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार यांनी प्रचार सभेच्या सांगता सभेवेळी बोलताना व्यक्त केला.
कुडाळ, ता. जावळी येथे कारखाना बचाव पॅनेलच्या वतीने सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, जावळीच्या विद्यमान आमदारांना जर खरच सौरभ शिंदे आणि प्रतापगड कारखान्याचा कळवळा असता तर बँकेचे अध्यक्ष असताना कारखान्याला मदत केली असती. निवडणूक म्हंटले की आरोप-प्रत्यारोप होतात पण येवढ्या खालच्या पातळीची टीका आम्ही केली नाही. कुडाळ जिल्हा परिषद गटातून तीन वेळा निवडून येत असल्याने येथील जनतेचे माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळेच ही निवडणुक त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढवत आहे.
सुधीर पवार म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षे जे सभासदांच्या दारात गेले नाहीत, ते या निवडणुकीच्या माध्यमातून जाऊ लागले आहेत. ज्यांनी कारखाना उभारणीसाठी प्रामाणिकपणे मदत केली ते सभासद आज तुमच्या बरोबर आहेत का? असा सवाल करून आम्ही संस्था काढल्या त्या आजही अस्तित्वात आहेत असे सांगितले. आमच्या विरोधात अख्खा तालुक्यातील नेते एकत्र आले असले तरीही ही लढाई आम्ही आमच्या ताकदीवर नक्कीच लढवू.
यावेळी बचाव पॅनेलचे उमेदवार भानुदास भोसले, शिवाजीराव गायकवाड, संजय शिंदे आदींनी मनोगते व्यक्त केली. प्रकाश रासकर यांनी प्रास्ताविक केले.

COMMENTS