Homeताज्या बातम्या

बार्शीनाका रेल्वे स्टेशनचे कामा सह बीड ते मुंबई पुणे सुरू होणार- खा. सोनवणेसंपादक भंडारीच्या मार्गदर्शनात, खुर्शीद आलम यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीची बैठक

बीड शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी बार्शीनाका (इमामपूर रोड) येथे रेल्वे स्टेशन उभारण्याच्या मागणीसाठी गेल्या 18 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला

खोट्या गुन्ह्याप्रकरणी दोषी पोलीस अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करा; खा. बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
परळीतील तौहीद पठाण हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा; खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी, पीडित कुटुंबाची घेतली भेट
रेल्वेचे इंटरलॉकिंगचे काम पुर्ण; लवकरच बीड-पुणे-मुंबई धावणार रेल्वेखा.बजरंग सोनवणे यांनी घेतला रेल्वेसह विविध विभागांचा आढावा; सलग सहा तास बैठका



बीड शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी बार्शीनाका (इमामपूर रोड) येथे रेल्वे स्टेशन उभारण्याच्या मागणीसाठी गेल्या 18 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला आता गती मिळाली असून, बार्शीनाका रेल्वे स्टेशन बचाव कृती समितीने पुन्हा एकदा या प्रश्नासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. संपादक गम्मतभाऊ भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि कृती समितीचे संस्थापक-अध्यक्ष खुर्शीद आलम यांच्या नेतृत्वाखाली खा. बजरंग (बप्पा) सोनवणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात बार्शीनाका रेल्वे स्टेशन हे बीड शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने सर्वाधिक सोयीचे ठिकाण असल्याचे नमूद करण्यात आले. स्टेशनला मंजुरी मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनचे काम तातडीने सुरू करण्यासाठी केंद्र व रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी बार्शीनाका रेल्वे स्टेशनच्या कामासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असून, लवकरच कामाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच बीड-मुंबई आणि बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी ड. देविदास गोस्वामी, ड. चित्रभुज, माजी सभापती संजय उडान, गोरख शिंगण, नितीन जायभाय, कुणाल पायाळ, शाम मार्कंडे, महेश शिंगण, मोमीन शहेबाज, सतीश जाधव, पाशा शेख, सोनू सौदागर यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS