Homeताज्या बातम्या

पाटोद्यात 15 वर्षीय मुलीचा बालविवाह रोखलनवरदेवासह नातेवाईकांवर गुन्हा; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची तत्पर कारवाई

गुप्त माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पाटोदा तालुक्यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह उधळून लावत सामाजिक बांधिलकीच

बलुतेदार संस्था अध्यक्षपदी दिगंबर नाईकनवरे तर उपाध्यक्षपदी बबन पवार
पाटोदा सुविधा केंद्रात कामगारांची लूट थांबवा; दोषींवर तात्काळ कारवाई करा – सचिन बोबडे
उद्योजक राहुल भारत लोखंडे यांची आत्महत्या
Kharaadi Minor Girl Child Marriage Case; Nine Booked



गुप्त माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पाटोदा तालुक्यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह उधळून लावत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. या प्रकरणी नवरदेवासह विवाहास उपस्थित असलेल्या नातेवाईकांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या प्रभारी अधिकार्‍यांना 27 जून रोजी गुप्त बातमीदारामार्फत पाटोदा येथे दुपारच्या सुमारास एका 15 वर्षीय मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली. माहितीची तातडीने दखल घेत वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविण्यात आले. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वेशांतर करून घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित अल्पवयीन मुलीला वराच्या घरी लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी परिसरात कसून शोधमोहीम राबवून मुलगी व आरोपी नवरदेवाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत अल्पवयीन मुलीचा विवाह अभिषेक बाबासाहेब मुंडे याच्यासोबत झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 198/2026 दाखल करण्यात आला. आरोपी वरासह विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या संबंधित नातेवाईकांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 मधील कलम 9, 10 आणि 11 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मीरा रेडेकर, उषा चौरे, महिला पोलिस हवालदार शोभा जाधव तसेच प्रदीप येवले, अशोक शिंदे, सविता चव्हाण, भाऊसाहेब कारले, संदीप गर्जे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, बीड येथील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

COMMENTS