बीड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (ठढज) म्हणून मा. सुरेश आव्हाड साहेब यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीनिमित्त अल्पसंख्याक बीड जिल्हा

बीड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (ठढज) म्हणून मा. सुरेश आव्हाड साहेब यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीनिमित्त अल्पसंख्याक बीड जिल्हाध्यक्ष सरफराज काझी यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार तसेच नागरिकांनी आव्हाड साहेबांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. उपस्थितांनी त्यांच्या अनुभवाचा व कार्यक्षमतेचा परिवहन विभागाच्या कामकाजात निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. कर्तव्यनिष्ठ, अभ्यासू आणि प्रशासकीय कामकाजाची जाण असलेले अधिकारी म्हणून सुरेश आव्हाड यांची ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यातील परिवहन विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल तसेच नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी वरिष्ठ लिपिक मा. विक्रम राजपूत साहेब तसेच बाबा काझी यांची उपस्थिती होती.

COMMENTS