Homeताज्या बातम्या

अजित भेंडेकर साहेबांचा वाढदिवस उत्साहात साजराशेख वसीम यांच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा

बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कर्तव्यदक्ष लिपिक तथा सर्वांच्या परिचयाचे आदरणीय अजित भेंडेकर साहेब यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा क

राजर्षी छत्रपती शाहू महाराज बहुजनांचे आधारवड आणि उत्तम शासक व प्रशासक होते – डॉ. वसुदेव गायकवाड
जिल्ह्याच्या भल्यासाठी खा.बजरंग सोनवणेंचा विकासकामांवर फोकस कायमआज विविध प्रलंबित प्रश्नांवर मॅरेथॉन बैठकांचे आयोजन; रेल्वे, वीज आणि विकासकामांचा होणार आढावा
परळीत थार गाडीची धडक की जीवघेणा हल्ला?प्रशांत देशमुख गंभीर जखमी; सीसीटीव्हीत थार कैद, आरोपीच्या अटकेची मागणी


बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कर्तव्यदक्ष लिपिक तथा सर्वांच्या परिचयाचे आदरणीय अजित भेंडेकर साहेब यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवर, सहकारी व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शिक्षण विभागातील कामाचा प्रदीर्घ अनुभव, जबाबदारीने केलेले कार्य आणि कर्मचार्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांना नेहमी सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती यामुळे अजित भेंडेकर साहेब हे सर्वांचे विश्वासू व लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा गौरव आणि आदर व्यक्त करत शेख वसीम यांनी भेंडेकर साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी शेख वसीम यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, अजित भेंडेकर साहेबांचे कार्य, प्रामाणिकपणा आणि मनमिळावू स्वभाव हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. यावेळी उपस्थितांनीही भेंडेकर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS