Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत गोवर रुग्णांच्या संख्येत घट

मुंबई : मुंबईत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गोवरचा उद्रेक झाल्यामुळे अनेक बालके बाधित झाली होती. गोवरच्या रुग्णांमध्ये लसीकरण न झालेल्या बालकांचा समावे

तर रस्त्यावरची लढाई लढावी लागेल !
विषबाधा, भूतबाधा पेक्षा भयंकर अशी ‘गांधी बाधा’ यावर तोडगा म्हणजे छत्रपती
काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी

मुंबई : मुंबईत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गोवरचा उद्रेक झाल्यामुळे अनेक बालके बाधित झाली होती. गोवरच्या रुग्णांमध्ये लसीकरण न झालेल्या बालकांचा समावेश होता. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत डिसेंबरमध्ये 100 पेक्षा अधिक गोवरग्रस्त बालकांवर उपचार सुरू होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून गोवरच्या रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 80 इतकी आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास लवकरच गोवर रुग्णांची संख्या शून्यावर येण्याची शक्यता आहे. गोवरचा उद्रेक झाल्यानंतर मुंबईतील गोवरबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. महिनाभरात मुंबईतील गोवरबाधित रुग्णांची संख्या शंभरी पार गेली. त्यामुळे रूग्णालयात 100 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने लसीकरण मोहिमेवर भर देत नियमित लसीकरणाची 7 हजार 499 सत्रांमधून 28 हजार 416 बालकांचे लसीकरण केले, तर 4 हजार 99 अतिरिक्त लसीकरण सत्रांमधून 32 हजार 189 बालकांचे लसीकरण केले. तसेच विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत 1 लाख 5 हजार 135 बालकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे वाढती रुग्ण संख्या रोखण्यात यश आले. डिसेंबरमध्ये रुग्णालयांत 100 पेक्षा अधिक बालके उपाचासाठी दाखल होती. मागील 10 दिवसांपूर्वी 100 पेक्षा अधिक रुग्ण रूग्णालयात उपचार घेत होते. मात्र आता हीच संख्या 77 इतकी झाली  आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे अशाच प्रकारे रुग्ण संख्या कमी होत राहिल्यास लवकरच गोवरबाधित रुग्णसंख्या शून्यावर पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

COMMENTS