केज शहरात विनापरवाना व बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या ऑनलाईन जुगारावर केज पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोटस 365 पच्या माध्यमातून विविध खेळांवर

केज शहरात विनापरवाना व बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या ऑनलाईन जुगारावर केज पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोटस 365 पच्या माध्यमातून विविध खेळांवर जुगार खेळणार्या आणि खेळविणार्या 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 8 लाख 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुरुवार दि. 25 जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही व्यक्ती लोटस 365 नावाच्या ऑनलाईन पवर जुगार चालवत आहेत. या माहितीनंतर विशेष पथकाने तातडीने कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत आरोपी अनंत नवनाथ खंदारे (वय 23, रा. कारेगव्हाण, जि. बीड), अक्षय अनिल गायकवाड (वय 20, रा. पुणे), अनिल कबीर सानप (वय 23, रा. बीड), आसाराम बळीराम केकाण (वय 25, रा. दरडवाडी, ता. केज), गणेश लक्ष्मण खंदारे (वय 22, रा. कारेगव्हाण), हर्षल मनोहर खंडारे (वय 27, रा. अमरावती), सुशील दत्तात्रय मुंडे (वय 24, रा. वडवणी) आणि विशाल उत्तम बारवाळ (वय 20, रा. छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, हे आरोपी नागरिकांना जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन जुगार खेळत व खेळवत होते. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, मोटारसायकली व इतर साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालामध्ये 34 मोबाईल, 4 मोटारसायकली व इतर साहित्याचा समावेश असून त्याची एकूण किंमत 8 लाख 14 हजार 500 रुपये आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार धोंडीराम योगीराज मोरे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू वंजारे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली. पथकात पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पोलीस हवालदार धोंडीराम मोरे, राजू वंजारे, विशाल क्षीरसागर, अनिल मंदे, मिसबा इनामदार, मल्लिकार्जुन माने, पोलीस अंमलदार जरगर आणि मयूर टकले यांचा समावेश होता.

COMMENTS