Homeताज्या बातम्या

पोलिओ लसीकरणास बेलापूरमध्ये मोठा प्रतिसाद 

बेलापूर : बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित 'राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रा

निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याच्या तयारीचा अधिकाऱ्यांकडून आढावा
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी भाजप बळकट करावा: बेलापूर येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार
ड्रोन व चोरट्यांबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये; पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे आवाहन
Pulse Polio programme 2021 begins from January 31 to Feb 2 | Pulse Polio |  देशात आजपासून पोलिओ लसीकरणाची सुरुवात; 2 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार मोहीम

बेलापूर : बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहा सेंटर्स अंतर्गतच्या 12 गावातील  3318 बालकांना पोलिओ लसीकरणाचे डोस देण्यात आले. प्रारंभी तालुका संजय गांधी निराधार संमतीचे अध्यक्ष शरद नवले तसेच बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे हस्ते पोलिओ डोस देऊन लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी लिप्टे, दाणी, अध्यक्ष पुरुषो, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाणी, भाजपचे तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम तभराटे,तस्वर बागवान,प्रतापराव हुडे,आरोग्य सहायिका ग्रेटा कदम, अंगणवाडी सेविका,आशा सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.सदर मोहिमेबाबत ग्रामपंचायत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्तरावरून जनजागृती करण्यात आली होती. या अभियांनासंदर्भात आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच आशा सेविकामार्फत संपर्क मोहीम राबविण्यात आली.यामुळे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गतच्या सहा सेंटर्सद्वारे 12 गावातील 3318 बालकांना डोस देऊन पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.

COMMENTS