Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखंड हरिनाम सप्ताहसाठी निघोज ग्रामस्थांचे अमूल्य योगदान ः जंगले महाराज शास्त्री

निघोज प्रतिनिधी ः गेली 47 वर्षं अखंड हरिनाम सप्ताह सुरू ठेउन निघोज ग्रामस्थ व निघोज ग्रामीण संस्था परिवार तसेच मुंबईकर मंडळ यांनी धार्मिक संस्कृत

खर्डाला मुस्लिम समाजाने  केले पावसासाठी नमाज पठण
पाथर्डी शहरातील खंडोबा मंदिरात चोरी
नगर तालुका बाजार समितीच्या 18 जागांसाठी 228जण रिंगणात

निघोज प्रतिनिधी ः गेली 47 वर्षं अखंड हरिनाम सप्ताह सुरू ठेउन निघोज ग्रामस्थ व निघोज ग्रामीण संस्था परिवार तसेच मुंबईकर मंडळ यांनी धार्मिक संस्कृती वाढविण्यासाठी अविरत प्रयत्न केले असून योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन जंगले महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले आहे. रामजन्म उस्तव निमित्ताने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ते उपस्थित भावीकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी मळगंगा कंट्रक्शनचे संस्थापक अध्यक्ष अमृताशेठ रसाळ यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  नंदू महाराज वराळ, श्रीहरी महाराज पवार, तुषार महाराज गुंड, मोहन महाराज घुले, साईनाथ महाराज काळे, रुपेश महाराज रुपवते, उत्तरेश्‍वर महाराज जाधव, धनंजय महाराज कांडेकर, गजानन महाराज शेजवळ, तुषार महाराज लाळगे, नारायण महाराज पवार, मोहन महाराज, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे माजी चेअरमन रामदासशेठ वरखडे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे  निघोज ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ तसेच अखंड हरिनाम सप्ताह समीतीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आदी असंख्य भावीक यावेळी उपस्थित होते. जंगले महाराज शास्त्री यांनी पाप,पुण्य तसेच धार्मिकता यावर सविस्तर विवेचन केले.  जुने मंदीर ते सध्याचे मंदिर या विषयी बोलताना त्यांनी तीस वर्षांपूर्वीच्या आठवणी सांगितल्या, निघोज ग्रामीण संस्था परिवाराचे संस्थापक अध्यक्ष  बाबासाहेब कवाद व ग्रामस्थ तसेच मुंबईकर मंडळ यांनी श्रीराम मंदीराचे बांधकाम उत्कृष्ट पद्धतीने केले. अखंड हरिनाम सप्ताह समीतीने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करीत आजपर्यंत नामवंत किर्तनकारांचे किर्तने आयोजित करुण गाव व परिसरात धार्मिक संस्कृती जतन करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी निघोज व पंचक्रोशीतील भावीक मोठ्या संख्येने उपस्थित राहीले हीच प्रेमाची शिदोरी भक्तीमार्ग संस्कृती दाखवीणारी असून असेच कार्य करीत राहा वय झाले मात्र निघोजच्या ग्रामस्थांच्या प्रेमाखातर आपण येत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव थोरात यांचा जंगले महाराज शास्त्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्ती महाराज तनपुरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले शेवटी सोमनाथ वरखडे यांनी आभार मानले.

COMMENTS