Homeताज्या बातम्या

वारी-कान्हेगाव पुलाची उभारणी ही विकासाची पायाभरणी : आ. काळे

कोपरगाव: विधानसभा मतदारसंघात बारा वर्षांपूर्वी जे लोकप्रतिनिधी लाटेमुळे निवडून आले त्यांना विकास कामे करता आली नाहीत. त्यामुळे वारी-कान्हेग

खा. वाकचौरेंच्या नेतृत्वात १०० शिवसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला शिर्डीत मोठे खिंडार
मुक्त पत्रकारितेच्या शिरपेचात मानाचा सातवा तुरा
आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

कोपरगाव: विधानसभा मतदारसंघात बारा वर्षांपूर्वी जे लोकप्रतिनिधी लाटेमुळे निवडून आले त्यांना विकास कामे करता आली नाहीत. त्यामुळे वारी-कान्हेगाव पुलाचे काम रखडले आणि रस्ते खड्ड्यात गेले. परिणामी, या महत्त्वाच्या गावाची अवस्था बेटासारखी झाली होती. मला लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळताच सुमारे वीस कोटी रुपये निधी मिळवून येथील पुलाचे काम करून दाखवले, तसेच या गावाला जोडणारे चारही बाजूंचे रस्ते भक्कम केले. एका अर्थाने आपण माजी आमदार अशोकराव काळे यांचे स्वप्न पूर्ण केले, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून गोदावरी नदीवर वारी कान्हेगाव येथे उभारलेल्या पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामनाथजी कारवा होते. यावेळी सोमय्या केमिकल्सचे कार्यकारी संचालक सुहास गोडगे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, संचालक सुधाकर रोहम, दिलीपराव बोरनारे, प्रशांत घुले, श्रावण आसने, सुरेश जाधव, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी वारी येथे आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून मिळालेल्या बंदिस्त व्यायाम शाळेचेही लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे बोलताना आमदार काळे म्हणाले की, स्व. कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांचे संसदेतील मित्र केंद्रीय रस्ते राज्यमंत्री मुनियप्पा यांच्या सहकार्याने माजी आमदार अशोकराव काळे यांनी २००४ ते २०१४ या दहा वर्षांत विरोधी पक्षाचे आमदार असताना देखील गोदावरी नदीवर पुलांची मालिका उभारली. त्यात धारणगाव-कुंभारी, चास नळी, कोपरगाव शहर व बेट, राज्यमार्ग ७ वरील देर्डे फाटा, तसेच सावळीविहीर-भरवस रस्त्यावरील सातमोऱ्याजवळ, झगडे फाटा येथे आणि धामोरी रस्त्यावरील कुर्ला नाल्यावरील पूल अशा अनेक छोट्या-मोठ्या पुलांचा समावेश आहे. त्या काळात मागे राहिलेला वारी कान्हेगावचा पूल आता पूर्ण झाला असून, गेली चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला हा महत्त्वाचा प्रश्न अखेर सुटला आहे.

COMMENTS