Homeताज्या बातम्या

बालमटाकळी येथे वडाची पूजा करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी; पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींनी मनोभावे श्रद्धापूर्वक केले व्रत। लोकमंथन News२४

https://www.youtube.com/watch?v=gKWo_DKn_K4 भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय असल्याने येथे प्रत्येक ऋतू, तिथी आणि मानवी भावना यांच्याशी जोडलेले सण

भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी अनारसे
दफनविधीनंतर ‘मृत’ शब्बीर जिवंत परतला !व्हॉट्सॲपवरील फोटोने उलगडले रहस्य;  प्रशासनापुढे पेच
अवघ्या सहाव्या वर्षी ‘केदारकंठ’ सर ! अकोलेच्या मणिकर्णिकाचा राष्ट्रीय विक्रम; जिद्दीने हिमालयालाही गवसणी

भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय असल्याने येथे प्रत्येक ऋतू, तिथी आणि मानवी भावना यांच्याशी जोडलेले सण आहेत. काही सण विज्ञानावर आधारित, काही निसर्गाशी सुसंगत तर काही सण स्त्री-पुरुषांच्या प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंब व्यवस्थेच्या बळकटीसाठी रचले गेले आहेत. त्यातच एक अतिशय भावनिक, श्रद्धेचा आणि पतिव्रतेच्या पवित्रतेचा सण म्हणजे वटपौर्णिमा किंवा वटसावित्री पूजन.
वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया पूर्ण सौभाग्यवतीच्या स्वरूपात वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. त्या झाडाला पवित्र धागा गुंडाळून वडाच्या झाडाची पूजा करतात,
आणि आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे यासाठी सावित्री-सत्यवान यांच्या दिव्य प्रेमाची आठवण करत उपवास, व्रत आणि पूजन करतात. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो , वडाच्या झाडाला भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानले जातअसल्याने गावागावा सुवासिनी महिला भक्तिभावाने वडाच्या झाडाला पूजा करतात .
शेवगाव तालुक्याच्या गावागावात वडाच्या झाडाभोवती पूजन करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

COMMENTS