Homeताज्या बातम्या

‘वृद्धेश्वर’वर आ. राजळेंची तर ‘मुळा’वर गडाखांची एकहाती सत्ता; साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे निर्विवाद वर्चस्व

पाथर्डी: श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार मोनिका राजळे गटाने अपेक्षेप्रमाणे दोन्हीही जाग

बीडमध्ये आरक्षण वर्गीकरणावर परिसंवादाचे आयोजन; ५ जुलै रोजी सामाजिक न्याय भवनात होणार चर्चा
आसाममध्ये ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के; कचार जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
महावितरणच्या कोतूळ उपकेंद्राचा कारभार रामभरोसे; ‘सहाय्यक अभियंता’ पद रिक्त; वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांत संताप

पाथर्डी: श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार मोनिका राजळे गटाने अपेक्षेप्रमाणे दोन्हीही जागेवर विजय मिळवत कारखान्याची सत्ता एकहाती ताब्यात घेतली आहे. या निवडणुकीत राजळे विरोधी गटाकडून उभे राहिलेले उमेदवार शिवशंकर राजळे यांचा पराभव झाला असला, तरी त्यांनी घेतलेली लक्षणीय मते सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत.

कारखान्याच्या एकूण १९ जागांपैकी १७ जागा यापूर्वीच राजळे गटाने बिनविरोध निवडून आणल्या होत्या. मात्र, कासार पिंपळगाव गटातील दोन जागेसाठी कारखान्याचे चेअरमन आप्पासाहेब राजळे, उद्धव वाघ आणि शिवशंकर राजळे असा तिरंगी सामना रंगला. यामध्ये आप्पासाहेब राजळे यांना सर्वाधिक ४,९३२, उद्धव वाघ यांना ४,१५८ तर शिवशंकर राजळे यांना १,६४२ मते मिळाली; तर ६७ मते अवैध ठरवण्यात आली.

सकाळी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते व तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांच्या अधिपत्याखाली मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या फेरीपासूनच सत्ताधारी गटाच्या दोन्ही उमेदवारांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. या निवडणुकीत एकूण ५,६८० मतदान झाले होते, त्यापैकी आप्पासाहेब राजळे यांनी ४,९३२ मते घेत आजही सहकार क्षेत्रातील आपला दबदबा सिद्ध केला आहे.

‘मुळा’वर माजी मंत्री शंकरराव गडाखांचे निर्विवाद वर्चस्व

दुसऱ्या बाजूला, मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलने पुन्हा एकदा एकहाती सत्ता कायम राखली आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर २१ पैकी १७ जागा बिनविरोध जिंकणाऱ्या गडाख पॅनलने उर्वरित चार जागांवरही सुमारे सहा हजार मतांच्या विक्रमी आघाडीने विजय मिळवत विरोधी पॅनलचा दारुण पराभव केला.

करजगाव गटातून चंद्रकांत भानुदास टेमक (६,८९५ मते) आणि ज्ञानेश्वर रामराव दरंदले (६,७२५ मते) यांनी दणदणीत विजय मिळविला. येथे विरोधी उमेदवार नारायण डौले (८४७) व किरण जाधव (१,०४१) यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल. तसेच महिला राखीव मतदारसंघातून गडाख पॅनलच्या कमल चांगदेव दहिफळे (७,४०१) आणि विमल नारायण सोनवणे (७,१८२) विजयी झाल्या, तर विरोधी उमेदवार मीराबाई दिवटे यांना केवळ १,००० मतांवर समाधान मानावे लागले.

‘वृद्धेश्वर’चे विजयी संचालक:

  • सर्वसाधारण गट: आप्पासाहेब राजळे, उद्धव वाघ, सुभाष ताठे, अनिल फलके, श्रीकांत मिसाळ, नारायण काकडे, बाबासाहेब किलबिले, रामकिसन काकडे, सुभाष बुधवंत, यशवंतराव गवळी, सुरेश आठरे, शेषराव ढाकणे, बाळासाहेब गोल्हार.
  • सहकारी संस्था गट: राहुल राजळे
  • अनुसूचित जाती गट: काकासाहेब शिंदे
  • महिला राखीव गट: सिंधुबाई जायभाय, मोनिका राजळे
  • इतर मागास गट: बापूसाहेब पाटेकर
  • विमुक्त जाती गट: संदीप लोखंडे

COMMENTS