Homeताज्या बातम्या

राज्यात आज ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’

० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई: राज्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने कैद्यांच्या पुनर्वसनाला नवी दिशा; टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस संस्थेशी सामंजस्य करार
धुळे-सोलापूर महामार्गावर रात्री दुचाकीस्वाराला लुटणार्‍या टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश; चार आरोपी जेरबंद
आसूड मोर्चातील अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण; जवळगावकरांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष
Health Minister Prakash Abitkar Directs Patient-Centric Care | Maharashtra

० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई: राज्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी रविवार, २८ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. या मोहिमेसाठी राज्यभरात ८९,४८९ लसीकरण बूथ, २६,५३० ट्रान्झिट पथके, १३,५११ मोबाईल पथके आणि ५८६ रात्रपाळी पथके कार्यरत राहणार आहेत.

देशाला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात पोलिओचा शेवटचा रुग्ण सप्टेंबर २०१० मध्ये बीड जिल्ह्यात आढळला होता, तर देशातील शेवटचा रुग्ण जानेवारी २०११ मध्ये पश्चिम बंगालमध्ये नोंदविण्यात आला होता. त्यानंतर २७ मार्च २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताला पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले. मात्र, शेजारील काही देशांमध्ये अद्यापही पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने देशात या आजाराचा प्रसार होण्याचा धोका कायम असून सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात रविवार, २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत राज्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील अंदाजे १ कोटी ३ लाख बालकांना सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत पोलिओ प्रतिबंधक बायव्हॅलंट ओरल पोलिओ व्हॅक्सीन (bOPV) चे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत.

जे बालक काही कारणास्तव आज बूथवर येऊ शकणार नाहीत, अशा बालकांसाठी शहरी भागात पुढील पाच दिवस आणि ग्रामीण भागात पुढील तीन दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटी देऊन लसीकरण केले जाईल. तसेच प्रवासात असलेल्या बालकांसाठी बसस्थानके, रेल्वे स्टेशन व नाक्यांवर ट्रान्झिट, मोबाईल आणि रात्रपाळीच्या विशेष पथकांमार्फत लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

COMMENTS