Homeताज्या बातम्या

कणगर ग्रामपंचायतीत विकासकामांमध्ये भ्रष्टाचार नाही : घाडगे

देवळाली प्रवरा : कणगर बु. ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही विरोधकांकडून करण्यात येत असला, तरी त्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे ग्रामपंचायतीच्या नोंदी व प्रत्यक्ष विकासकामे दाखवून स्पष्ट करण्यात आले आहे. गावाच्या विकासकामांबाबत चुकीची माहिती पसरवून बदनामी करणाऱ्या विरोधकांविरोधात संभाजीनगर उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून न्याय मागणार असल्याचा इशारा सरपंच सर्जेराव घाडगे यांनी दिला.कणगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच घाडगे यांनी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा पत्रकारांसमोर मांडला. यावेळी त्यांनी गावातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि इतर विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून दिली. विरोधकांकडून ज्या रस्त्याचे काम झालेले नाही, अशा प्रकारे खोटे फोटो प्रसिद्धीसाठी दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.घाडगे म्हणाले की, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्या विकासकामांच्या प्रक्रियेत स्पष्ट फरक आहे. जिल्हा परिषदेच्या कामांच्या निविदा जिल्हा परिषद प्रशासनामार्फत राबविल्या जातात, तर स्थानिक स्वरूपाची कामे ग्रामपंचायतीमार्फत केली जातात. त्यामुळे सर्व कामे नियमानुसार आणि संबंधित विभागांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आली आहेत.विरोधक राजकीय हेतूने दिशाभूल करणारे आरोप करीत असल्याचा आरोप करताना घाडगे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आरोप होत असल्याचे सांगितले. काही व्यक्तींच्या सांगण्यावरून गावातील चार-पाच जणांना पुढे करून ग्रामपंचायतीची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र ग्रामस्थांना सत्य परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे,” असे घाडगे यांनी सांगितले.

रेल्वेखाली झेप घेत तरुणाची आत्महत्या
‘वादाच्या दुनियेतील पंचगिरी’ पुस्तकाचे शिर्डीत प्रकाशन
जवळे गावातील वृद्धांना आधार काठीचे वाटप 

COMMENTS