Homeताज्या बातम्या

घाटसावळीत नशामुक्त भारत अभियान सप्ताहाचा उत्साहात समारोपव्यसनमुक्ती काळाची गरज : प्रा. आजिनाथ शेरकर

बीड : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार तसेच समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली घाटसावळी येथे 19 ते 26 जून द

बीडमध्ये उपवर्गीकरण विरोधात आंबेडकरी समाजाचा महामोर्चाभाजप सरकारने जाती-जातीत भांडणे लावू नयेत;11 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
गायराण जमिनीच्या वादातून खून; आरोपी अवघ्या 6 तासांत जेरबंदगेवराई पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोघांना अटक, एक बालक ताब्यात
बीड जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर पुन्हा ’रॉकेल’ पर्व; 62 रुपये दराने मिळणार रॉकेलतहसीलदार विलास तरंगे यांच्या हस्ते टँकरचे उध्दघाटन


बीड : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार तसेच समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली घाटसावळी येथे 19 ते 26 जून दरम्यान राबविण्यात आलेल्या नशामुक्त भारत अभियान सप्ताहाचा जनजागृतीपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला.
श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था घाटसावळी संचलित जनसेवा व्यसनमुक्ती केंद्र व लोकनेते गोपीनाथराव मुंडे वृद्धाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रुग्णमित्र, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव फड, विश्वस्त चंद्रकांत बाप्पा फड तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन फड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घाटसावळी येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक शिवाजी पुरी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जगन्नाथ पवार उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख व्याख्याते तथा भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान समितीचे शासकीय सदस्य व प्रकल्प समन्वयक प्रा. आजिनाथ शेरकर यांनी व्यसनमुक्तीचे महत्त्व स्पष्ट करत युवकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, तरुण पिढी ही देशाचे भविष्य आहे. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे. व्यसनमुक्त समाज निर्माण करणे ही काळाची गरज असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. या सप्ताहात पथनाट्य, पोस्टर स्पर्धा, व्याख्याने यांसह विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांनी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहदेव फड यांनी केले तर आभार व्यवस्थापक अमोल नेहरकर यांनी मानले. पसायदान व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गिताराम गायकवाड, वर्षा शेरकर, सचिन दराडे, संकेत दराडे, गोरख फड, रामनाथ मुळे, दत्ता काळे, संजय फड, शशिकला दराडे व वंदना जाधव यांनी परिश्रम घेत.

COMMENTS