Homeताज्या बातम्या

विना अटी सरसकट शेतकरी कर्जमाफीची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नांदेड: राज्यातील शेतकर्‍यांना विना अटी सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसेच गायरान व शासकीय जमिनी कास्तकारांच्या नावे करण्यात याव्यात, या प्रमुख माग

मनपा शाळेमध्ये वाचक विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्याचा सृजनशील उपक्रम
रस्त्यावरील कथित अतिक्रमण प्रकरण पुन्हा चर्चेत; जिल्हा परिषदेकडून चौकशीचे आदेश
राडी येथे खेती बचाव अभियानाचा शुभारंभ; शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
29 जनवरी से प्रदेश में धरना-प्रदर्शन की घोषणा

नांदेड: राज्यातील शेतकर्‍यांना विना अटी सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसेच गायरान व शासकीय जमिनी कास्तकारांच्या नावे करण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान शेतमजूर सभेच्या वतीने गुरुवारी (दि. २५ जून) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने करण्यात आली.

संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकर्‍यांना कोणत्याही अटींशिवाय कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी पडीक शासकीय जमीन, जंगल व गायरान पट्टे प्रत्यक्ष कास्तकारांच्या नावे करण्याबरोबरच भूमिहीन कुटुंबांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनात अखिल भारतीय किसान शेतमजूर सभेचे केंद्रीय सचिव कॉ. अशोक घायाळे, महाराष्ट्र अध्यक्ष पी. डी. वासमवार, मानेजी पाटील चोळाखेकर, नेमीचंद राठोड, भानुदास आडे, प्रकाश राठोड, गुलाब पवार, कपिल राठोड यांच्यासह शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS