बीड: येथील अनुसूचित जाती कर्मचारी, सेवाकर्मचारी, अधिकारी युवक व महिला आघाडीच्या वतीने ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ०६:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बीड: येथील अनुसूचित जाती कर्मचारी, सेवाकर्मचारी, अधिकारी युवक व महिला आघाडीच्या वतीने ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ०६:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे ‘अनुसूचित जातीचे वर्गीकरण, आरक्षण संपवण्याचे षडयंत्र’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाला बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या परिसंवाद प्रसंगी मुख्य वक्ते आणि विचारवंत म्हणून परमानंद मेश्राम (नागपूर), बी.डी. घोडे (मुंबई), रोहिदास बनसोडे (सचिव, चर्मकार महासंघ, महाराष्ट्र) आणि लक्ष्मण शिंदे (छत्रपती संभाजीनगर) हे सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.
आयोजन समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देशात अनुसूचित जाती/जमाती संघटित होऊन जातीयवादी शक्तींच्या विरोधात संघर्ष करत आहेत. यामुळे मनुवादी व्यवस्था उद्ध्वस्त होते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या विषयावरून समाजामध्ये जाती-जातीत भांडणे लावण्याचे षडयंत्र सुरू आहे. जाती-जातीत भेद निर्माण करणे, अनुसूचित जातीच्या संघटित शक्तीचे विभाजन करणे आणि चळवळीला कमकुवत करून संविधानिक आरक्षण संपवणे हाच यामागील मुख्य हेतू आहे. या षडयंत्रापासून समाजाला जागृत करण्यासाठी आणि संघटित करण्यासाठीच या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण चर्चेला जिल्ह्यातील अनुसूचित जातीचे कर्मचारी, अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी, युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS