Homeताज्या बातम्या

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील विकास कामे तातडीने सुरू करा; अन्यथा २ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

बीड: अनुसूचित जाती आरक्षित प्रभागांच्या विकासासाठी असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील मंजूर विकास कामे तातडीने सुरू करावी

छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त बीडमध्ये ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन; समता परिषदेचा पुढाकार
जग हादरले! व्हेनेझुएलामध्ये ७.५ तीव्रतेचा प्रलयंकारी भूकंप, जपानलाही ६.९ तीव्रतेचे धक्के; १० हजारांहून अधिक मृत्यूची भीती
वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी)नंबरप्लेट 30 जुन पुर्वी बसविणे बंधनकारक

बीड: अनुसूचित जाती आरक्षित प्रभागांच्या विकासासाठी असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील मंजूर विकास कामे तातडीने सुरू करावीत, अन्यथा २ जुलै २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भीम स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अ‍ॅड. विकास जोगदंड यांनी दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत नगर परिषद बीडला नऊ महिन्यांपूर्वी निधी प्राप्त झाला आहे. तसेच सिताई कन्स्ट्रक्शनच्या नावे १७ एप्रिल २०२६ रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. मात्र आदेश देऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अनुसूचित जातीच्या सहा आरक्षित प्रभागांमधील विकास कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. विकास कामे सुरू करण्यास होत असलेल्या विलंबामुळे अनुसूचित जाती समाजावर तसेच आरक्षित प्रभागांवर अन्याय होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यांवरील खड्डे, दगड-गोटे आणि चिखलामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच खराब रस्त्यांमुळे पादचारी व दुचाकी वाहनधारकांचे अपघात होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मंजूर निधीनुसार प्रस्तावित विकास कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन देताना अ‍ॅड. विकास जोगदंड यांच्यासह अ‍ॅड. मिलिंद वाघमारे, मंगेश जोगदंड, राजेशभाई कोकाटे, विष्णू गायकवाड, महादेव वंजारे, तेजस सावंत, आदर्शराजे जोगदंड, मुन्ना कोरडे, आदित्यराजे जोगदंड, यश कोरडे आदींच्या शिष्टमंडळाची उपस्थिती होती.

COMMENTS