Homeताज्या बातम्या

२६ जून रोजी वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मानूरकर महाराज आणि निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या शुभहस्ते होणार गौरव बीड: वीरशैव लिंगायत समाजातील इयत्ता दहावी आणि बारावी

रायचूर एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न फसलाधाडसी महिलेच्या प्रसंगावधानाने चोरट्याचा डाव उधळला; रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी)नंबरप्लेट 30 जुन पुर्वी बसविणे बंधनकारक
माळेगाव येथे नैसर्गिक शेती शाळेचे आयोजन; शेतकर्‍यांना विषमुक्त व शाश्वत शेतीचे प्रत्यक्ष धडे

मानूरकर महाराज आणि निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या शुभहस्ते होणार गौरव

बीड: वीरशैव लिंगायत समाजातील इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ६० टक्के पेक्षा अधिक गुण घेतले आहेत, अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रकमेसह शुक्रवार दिनांक २६ जून २०२६ रोजी जाहीर नागरिक सत्कार करण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्र मानूरमठाचे मठाधिपती ष. ब्र. १०८ श्री गुरुविरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांच्या शुभाशीर्वादामध्ये तर बीड जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी साहेब यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडणार आहे. या सत्कारास पात्र असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसह समाज बांधवांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जगद्विवेक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

जगद्विवेक प्रतिष्ठान बीडच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील हा नागरी सत्कार शुक्रवार दिनांक २६ जून २०२६ रोजी स.मा. गर्गे भवन, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रस्ता, जिजामाता चौक, बीड या ठिकाणी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतलेले विद्यार्थी, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी जेई (JEE), सीईटी (CET), नीट (NEET), स्कॉलरशिप परीक्षा किंवा नवोदय परीक्षेमध्ये यश मिळवले असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह, मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांना सोबत घेऊन हा कौतुकाचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास स्वामी आणि सचिव वैभव स्वामी यांनी केले आहे.

रोख रकमेसह प्रमाणपत्र आणि झाड भेट देऊन होणार सन्मान

इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी जगद्विवेक प्रतिष्ठानकडे नोंदणी केली आहे, त्या विद्यार्थ्यांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रकमेसह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नोंदणी केलेल्या इतर सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि ‘झाड भेट’ देऊन वृक्ष संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविले जाईल.

समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – आवाहन

वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या या कौतुक सोहळ्यास आणि यानिमित्त तीर्थक्षेत्र नागनाथ मानूर मठाचे मठाधिपती श्रीगुरु विरुपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांचे शुभाशीर्वाद ऐकण्यासाठी, तसेच समाजाचे भूषण असलेले निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी साहेब यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन ऐकण्यासाठी बीड शहर आणि जिल्ह्यातील तमाम वीरशैव लिंगायत समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जगद्विवेक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS