Homeताज्या बातम्या

समुपदेशनाद्वारे जिल्ह्यातील ८६ केंद्रप्रमुख पदांची नियुक्ती; प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण

नांदेड: जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रिक्त असलेल्

कर्तव्यदक्ष अतिरिक्त पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांचा मातृभूमी प्रतिष्ठानकडून गौरव
जिल्हा न्यायालय बीड येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा! दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन
जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; विविध शासकीय योजनांची दिली सविस्तर माहिती

नांदेड: जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ८६ केंद्रप्रमुख पदांसाठी समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया यशस्वीरित्या आणि पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली. जिल्हा परिषद नांदेड येथील कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया पार पडली.

शिक्षण संचालक, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी पात्र शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर लेखी परीक्षा आणि कागदपत्रांची सखोल पडताळणी करून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानुसार जिल्ह्यातील केंद्रप्रमुख संवर्गातील ८३ सर्वसाधारण आणि ३ दिव्यांग अशा एकूण ८६ रिक्त पदांसाठी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता, पसंती आणि उपलब्ध रिक्त जागांच्या आधारे केंद्रांची निवड करण्याची संधी देण्यात आली.

७५ टक्के तालुका समतोल साधत अनुशेष भरला

जिल्ह्यातील केंद्रप्रमुख पदांच्या मोठ्या प्रमाणातील रिक्त जागांचा विचार करून सर्व तालुक्यांमध्ये शैक्षणिक प्रशासनाचा समतोल राखण्यासाठी ७५ टक्के तालुका समतोल साधत अनुशेष भरण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, सर्व तालुक्यांमध्ये केंद्रप्रमुखांची तुलनेने समप्रमाणात नियुक्ती करणे शक्य झाले असून यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील शैक्षणिक व्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे. विशेष म्हणजे, समुपदेशन प्रक्रियेदरम्यान अनेक शिक्षकांनी स्वेच्छेने किनवट आणि माहूर या पेसा (PESA) तालुक्यांमध्ये नियुक्तीसाठी पसंती दर्शविली.

उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार आणि सोयीच्या केंद्रांवर नियुक्ती मिळाल्याने संपूर्ण प्रक्रिया कोणतीही तक्रार न होता यशस्वीरित्या पूर्ण झाली. या प्रक्रियेसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्यासह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

नव्या नियुक्त्यांमुळे शैक्षणिक प्रशासनाला बळ

जिल्ह्यातील केंद्रप्रमुख पदांवरील रिक्त जागा मोठ्या प्रमाणात भरल्या गेल्याने शैक्षणिक प्रशासन अधिक गतिमान व प्रभावी होण्यास मदत होणार आहे. केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून शाळांच्या कामकाजावर अधिक प्रभावी देखरेख ठेवता येणार असून शिक्षणाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील, असा विश्वास प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी व्यक्त केला.

COMMENTS