Homeताज्या बातम्या

बीड शहर परिसरात चालकावर प्राणघातक हल्ला करून लूट; ग्रामस्थांनी एका चोरट्याला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

बीड: बीड शहराच्या बाहेरील रस्त्यावर एका चालकावर अज्ञात चोरट्यांच्या टोळीने प्राणघातक हल्ला करून लूट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्

नेकनुर येथील एसबीआय एटीएम चार महिन्यांपासून बंद; नागरिकांचा बँक प्रशासनाविरोधात संताप
पवार कुटुंबियांच्या आनंदात मुंडे परिवार सहभागी! बाळदादा पवार यांच्या चिरंजीवाच्या विवाहास ना. पंकजाताई मुंडे, डॉ. प्रीतमताई मुंडे यांची उपस्थिती
नांदेड विभागातील विशेष तिकीट तपासणी मोहिमेत ५४३ प्रकरणे निष्पन्न; ३.८१ लाखांचा महसूल वसूल
क्षुल्लक कारणावरून युवकावर प्राणघातक हल्ला Vashim Marathi News | Assault on  a youth for trivial reasons | Latest Vashim News at Lokmat.com

बीड: बीड शहराच्या बाहेरील रस्त्यावर एका चालकावर अज्ञात चोरट्यांच्या टोळीने प्राणघातक हल्ला करून लूट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात राजेंद्र नागरे हे गंभीर जखमी झाले असून, हल्लेखोरांनी त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम लुटून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आसपासच्या ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका चोरट्याला रंगेहाथ पकडण्यात यश आले आहे.

धारदार शस्त्राने वार; चालक गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र नागरे हे आपल्या कामानिमित्त जात असताना रस्त्यात चोरट्यांच्या टोळीने त्यांना अचानक अडवले. काही कळण्याच्या आतच या टोळीने त्यांच्यावर लाठ्याकाठ्या आणि धारदार शस्त्राने हल्ला चढवला. नागरे यांच्या अंगावर, पाठीवर, मनगटावर आणि तळहातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हल्ला इतका भीषण होता की, नागरे हे रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले.

ग्रामस्थांनी पाठलाग करून चोरट्याला चोपले

हल्ल्यानंतर नागरे यांनी आरडाओरड केल्याने आसपासचे ग्रामस्थ आणि शेतकरी तातडीने घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांना येताना पाहून चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी पाठलाग करून एका चोरट्याला जागीच पकडले. संतप्त ग्रामस्थांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि बीड शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पकडलेल्या आरोपीला ताब्यात घेतले असून, गंभीर जखमी राजेंद्र नागरे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. बीड शहर पोलिसांनी या प्रकरणी जबरी चोरी आणि प्राणघातक हल्ल्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे बीड परिसरात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

COMMENTS