Homeताज्या बातम्या

बीडमध्ये कादरी फाउंडेशन आक्रमकनाजिया इलाही खान यांच्यावर कारवाईची मागणी, अन्यथा हजारोंचा मोर्चा व उपोषणाचा इशारा

बीड : कादरी फाउंडेशनच्या बीड जिल्हा पदाधिकार्‍यांनी नाजिया इलाही खान यांच्या कथित वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित प्रकरणाची चौक

निसर्गप्रेमींचा नाशिक महापालिकेवर मोर्चा
तामसा-हदगाव राज्यमार्गावर मृत्यूचे तांडव; रस्ते विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा
ओव्हरलोडिंग धोकादायक; अवैध रेती वाहतूक तात्काळ बंद करा, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा


बीड : कादरी फाउंडेशनच्या बीड जिल्हा पदाधिकार्‍यांनी नाजिया इलाही खान यांच्या कथित वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित प्रकरणाची चौकशी करून तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
कादरी फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख शहबाज यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी प्रशासनाकडे आपली भूमिका मांडली. धार्मिक भावना दुखावतील अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य किंवा कृती झाल्यास त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी शेख शहबाज यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, या प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास बीड जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठा मोर्चा काढण्यात येईल. तसेच मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या मागणीमुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक आणि धार्मिक वर्तुळात चर्चांना वेग आला असून, प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS