Homeताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची सरशीना. पंकजा मुंडे यांच्याकडून नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश संपादन करत 17 पैकी 16 जागांवर विजय मिळविला आहे. या विजयानंतर राज्

महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरणजम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट
अवाजवी घरपट्टी विरोधात कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे धरणे    
गोदावरी नदीत बुडून तिघींचा मृत्यू



स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश संपादन करत 17 पैकी 16 जागांवर विजय मिळविला आहे. या विजयानंतर राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री झरपज्ञरक्षर र्चीपवश यांनी विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आज झालेल्या मतमोजणीत 11 जागांचे निकाल जाहीर झाले. त्यापैकी 10 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. यापूर्वीच 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे एकूण 17 जागांपैकी 16 जागांवर महायुतीने विजयाचा झेंडा फडकावला असून विरोधी आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही. बीड-धाराशिव-लातूर मतदारसंघातून विजयी झालेले इर्रीींरीरक्ष झरींळश्र यांच्यासह मराठवाड्यातील अमर राजूरकर, सईदखान आणि सुहास सिरसाठ यांचेही ना. पंकजा मुंडे यांनी अभिनंदन केले. तसेच नंदकिशोर महाजन, राजेंद्र राऊत, राजीव पोतदार, अविनाश ब्राह्मणकर, प्रवीण पोटे आणि धैर्यशील कदम या नवनिर्वाचित आमदारांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. महायुतीच्या या यशामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महायुतीची संघटनात्मक ताकद आणि जनाधार अधिक दृढ झाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. ना. पंकजा मुंडे यांनी सर्व विजयी उमेदवारांनी जनतेच्या अपेक्षांनुसार विकासाभिमुख काम करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

COMMENTS