Homeताज्या बातम्या

राज्यपालांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकार्‍यांसमवेत योगाभ्यास

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्र लोकभवन येथे भारतीय तटरक्षक दलातील अधिकार्‍यांसह योगसत्रात सहभ

नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; हजारो नागरिकांचा सहभाग, ‘करो योग रहो निरोग’चा संदेश
योगा दिनानिमित्ताने १५१ सूर्यनमस्कारांचा संकल्प यशस्वी  
योग दिनानिमित्त पाच दिवस मोफत ऑनलाइन योग वेबिनारचे आयोजनसहभागी होण्याचे राधा तांबे यांचे आवाहन


मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्र लोकभवन येथे भारतीय तटरक्षक दलातील अधिकार्‍यांसह योगसत्रात सहभाग घेतला. यावर्षी लोकभवनातील योग दिवस भारतीय तटरक्षक दलाच्या सहकार्याने साजरा करण्यात आला. भारतीय तटरक्षक दल यंदा स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. योगसत्राला तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसेच महाराष्ट्र लोकभवनातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा प्रचार-प्रसार करण्याचे तसेच जगासाठी उत्तम योग शिक्षक व प्रशिक्षक घडवण्याचे आवाहन केले. आज योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे, असे नमूद करून राज्यपाल म्हणाले की, शतकानुशतके योगाचा अभ्यास केवळ घरांमध्ये, आश्रम आणि योग संस्थांमध्ये केला जात असे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचे आवाहन केल्यानंतर आज जगातील 150 हून अधिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. सन 1977 झालेल्या स्थापनेपासून राष्ट्रसेवेत कार्यरत असलेल्या व यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या योगदानाचे राज्यपालांनी कौतुक केले.

COMMENTS