Homeताज्या बातम्या

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात हिंदवी स्वराज्याच्या जननी, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्र

उर्दुघर ला मिळाली तातडीने निधीसह मंजुरीआ.संदिप क्षीरसागरांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार
शेतरस्त्यावर अतिक्रमण; तहसीलदारांचे चौकशी व कारवाईचे आदेशस्थानिक महसूल अधिकार्‍यांवर अविश्वास; बाहेरील अधिकार्‍यांकडून चौकशीची मागणी
गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन


बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात हिंदवी स्वराज्याच्या जननी, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम आनंद मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ, बीडचे अध्यक्ष बी. एस. धुतालमल तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. ए. हावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ मासाहेब आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक संतोष मेश्राम, पवळ यू. बी. आणि आर. बी. घुले यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितले. मुख्याध्यापक बी. ए. हावळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राजमाता जिजाऊ यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वाभिमान, दूरदृष्टी आणि पराक्रमाच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले. त्यांच्या संस्कारांमधून रयतेचे कल्याणकारी राज्य निर्माण झाले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष मेश्राम यांनी केले, तर संचालन पवळ यू. बी. यांनी केले. आभार प्रदर्शन डब्ल्यू. एस. वाघमारे यांनी मानले. या प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक आर. बी. घुले, श्रीमती मुंडे, आनंद वसतिगृहाचे अधीक्षक डी. व्ही. खरसाडे, शिक्षकेतर कर्मचारी एल. बी. हजारे, सुभाष गायकवाड तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS