Homeताज्या बातम्या

भोकर येथे ठाकरे शिवसेनेचे ‘जोडे मारो’ आंदोलन; गद्दार खासदारांविरोधातबी संतापाचा उद्रेक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार शिंदे गटात गेल्याच्या निषेधार्थ भोकर येथे शिवसैनिकांनी शनिवारी तीव्र आंदोलन छेडले. ‘जोडे मारो’

गोदावरी महामंडळ कार्यालय स्थलांतराचा विखेंचा ‘बालहट्ट’खा. निलेश लंके ; निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ  
एकच कत्तलखाना दोनदा कसा हटविला? : हाडा  
शहरातील कॅफे बंद कराआ.सोळंके यांची पोलीस निरीक्षकाकडे मागणी



शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार शिंदे गटात गेल्याच्या निषेधार्थ भोकर येथे शिवसैनिकांनी शनिवारी तीव्र आंदोलन छेडले. ‘जोडे मारो’ आंदोलन करत खासदार नागेश पाटील आष्टीकर व इतर खासदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण, शहरप्रमुख पांडूरंग वर्षेवार, दिव्यांग सेना तालुकाप्रमुख विठ्ठलराव देवड, तालुका संघटक नंदू पाटील कौठेकर, शहर संघटक राहुल कोंडलवार, माजी तालुकाप्रमुख वामन पर्वत, उपतालुकाप्रमुख मारोती पवार, चेअरमन गंगाधर महादवाड, साहेबराव भोंबे आणि रमेश महागावकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. शनिवारी सकाळी सुमारे 11 वाजता किनवट रोडवरील घिसेवाड महाविद्यालय परिसरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी घोषणाबाजी करत खासदार नागेश पाटील आष्टीकर व इतर संबंधित खासदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. गद्दार खासदार मुर्दाबाद, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनात वसंत लखा जाधव, सर्जेराव शिंदे, गोविंद सानमवाड, अजय चव्हाण, कैलास कदम, दत्तू दिवशीकर, तानाजी जाधव, श्रीनिवास शिवायगार, सायारेड्डी प्रेमयगार, नागभूषण गायकवाड, अविनाश गमेवाड, मारोती काळेकर, अंकुश बशीटवाड, सचिन कोरटलावाड, मारोती आरगेवार यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक पल्लेवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले.

COMMENTS