Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावमध्ये तब्बल 16 लाखांचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 5 जणांवर गुन्हा दाखल

कोपरगाव तालुका ः कोपरगाव शहरात व उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असून यामुळे कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्‍न वारंवार निर्माण हो

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन निर्मिती करायचीय, पण….काष्टीच्या उद्योजकाला कच्चा मालच मिळेना
BREAKING: महाराष्ट्र लॉकडाउन…. New guidlines | पहा Lok News24
कोपरगावात शिवजन्मोत्सव उत्साहात होणार साजरा

कोपरगाव तालुका ः कोपरगाव शहरात व उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असून यामुळे कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्‍न वारंवार निर्माण होत आहे. कोपरगावत सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर थेट नगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत सुमारे 16 लाख 1,440 रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा व पिकप गाडी क्रमांक एम. पी.46,जी 2357 अंदाजे किंमत 6 लाख असा एकुण  16 1440 रुपयांचा मुद्देमाल  पुणतांबा चौफुली येथे बुधवारी 24 एप्रिल रोजी जप्त करण्यात आला आहे.
याबाबत संतोष राजेंद्र खैरे सायबर पोलीस ठाणे नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गाडी चालक राजू भिल मध्य प्रदेश , मितेश भाबड इंदौर, अभय गुप्ता इंदोर, योगेश कटाळे कोपरगाव, किरण लामखडे संगमनेर यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम 328,188,272,273,34 प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आला आहे. आरोपी मात्र फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे,,,या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे हे करत आहे. एकंदरीतच 100 किलोमीटर वरून स्थानिक गुन्हे शाखा कार्यरत आहे,हा अवैध व्यवसाय स्थानिक पोलिसांना दिसत नाही का, अनेक ठिकाणी मटका, जुगार,गावठी दारू अड्डे,,अवैध गुटखा विक्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राजरोसपणे सुरू आहे,या सगळ्या गोष्टींकडे मात्र पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही यामागे काही आर्थिक हितसंबंध आहे का, या अवैध व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखाच कारवाई करू शकते का  असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थितीत झाला आहे. थेट इंदोरवरून कोपरगाव येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटख्याची तस्करी होत असेल तर यामागे नक्कीच कोणाचा तरी मोठा हात असल्याशिवाय हे होणे सहज शक्य नाही, इतर वेळेला कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर रात्री लवकर बंद करण्यात येते, बंद फक्त सर्व सामान्य व्यापारी वर्गाचा असतो,मात्र अनेक ठिकाणी उशिरा रात्री अवैध व्यवसाय सुरू असतात त्यावर मात्र कारवाई होत नाही हा देखील मोठा विषय आहे, यावर वरिष्ठ अधिकारी तरी कारवाई करतील का असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेमध्ये उपस्थित झाला आहे

COMMENTS