Homeताज्या बातम्या

राज्यसभा सदस्य राजेंद्र जैन यांची आ. चिखलीकर यांच्या कार्यालयास भेट

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांनी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छ

ही मोहीम गांभीर्याने घ्या, अन्यथा महाराष्ट्राचा बंगाल होईल; आदित्य ठाकरेंचा इशारा
ही मोहीम गांभीर्याने घ्या, अन्यथा महाराष्ट्राचा बंगाल होईल; आदित्य ठाकरेंचा इशारा
पंतप्रधान मोदींचा १२ वर्षांचा कार्यकाळ ही केवळ सुरुवात, आगामी अनेक वर्षे देशात भाजप आणि एनडीएचेच शासन राहील – अमित शाह


नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांनी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड आणि आ. चिखलीकर परिवाराच्या वतीने खा . जैन यांचे मनःपूर्वक स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मोहम्मद खान  पठाण, भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे – चिखलीकर, लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शरद पवार, उदय चव्हाण समवेत नांदेड महानगर, ग्रामीणचे कार्यकर्ते, पदाधिकारी आदि उपस्थित होते. या भेटीत खा. जैन यांनी आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका , पक्षाची संघटनात्मक बांधणी , आगामी ध्येय धोरणे याबाबत आ. चिखलीकर यांच्याशी सखोल चर्चा केली.

COMMENTS