Homeताज्या बातम्या

कर्जत बाजार समितीत सोमवार-गुरुवारी नियमित लिलाव : तापकीर    

कर्जत :  कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी शेतमालाचे जाहीर लिलाव नियमितपणे घेण्यात येणार असल्याची माहित

संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त
रेल्वेखाली झेप घेत तरुणाची आत्महत्या
चिमुरड्यासह विवाहितेचा विहिरीत मृतदेहजामखेडमधील घटना; पोलिसांकडून तपास सुरू


कर्जत :  कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी शेतमालाचे जाहीर लिलाव नियमितपणे घेण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी दिली.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित व्यापारी बैठकीत कोविड-19 नंतर काही प्रमाणात विस्कळीत झालेली शेतमाल लिलाव प्रक्रिया अधिक नियमित करण्याबाबत बाजार समितीचे सर्व संचालक व व्यापारी आणि शेतकरी यांची एकत्र बैठक घेण्यात आली. त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने करता यावी, यासाठी सोमवार व गुरुवार या दोन दिवशी लिलाव प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या लिलावामध्ये तालुक्याबाहेरील सर्व व्यापाऱ्यांना देखील बाजार समितीमध्ये लिलावाला उपस्थित राहून बोली लावता येईल असा ऐतिहासिक निर्णय संचालक मंडळांनी घेतला.
 यावेळी बोलताना काकासाहेब तापकीर पुढे म्हणाले, लवकरच शेतकऱ्यांसाठी कृषी भवन विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मंजूर झाले असून त्याचे काम सुरू करण्यात येईल. बाजार समितीने अतिशय अल्पावधीत संपूर्ण राज्यामध्ये अग्रेसर असा नावलौकिक मिळवला आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अतिशय चांगला भाव देत असल्यामुळे विविध तालुक्यांमधून शेतकरी या ठिकाणी शेतीमाल विकण्यासाठी येतात. यापुढील काळामध्ये देखील सर्व सचालक मंडळाला सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचा विचार प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल असे तापकीर म्हणाले.  
यावेळी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी हित जपण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा आणि बाजार समितीतील व्यवहार अधिक पारदर्शक व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
 यावेळी  सभापती काकासाहेब तापकीर, श्रीहर्ष कैलास शेवाळे, बळीराम यादव, प्रफुल्ल नेवसे बापूसाहेब नेटके, रामदास मांडगे, वसंत कांबळे, अमोल पाटील, विजयकुमार भंडारी, सचिव विकास तनपुरे, कल्याण काळे तसेच व्यापारी पियुष कोठारी, कल्पेश दाते, दीपक निंबाळकर यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.

COMMENTS