Homeताज्या बातम्या

जीएसटी अधिकार्‍याला लाच घेतांना अटक

मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाच्या एका निरीक्षकाला लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे. एका व्यापा

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातसर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता ; 20 वर्षांनंतर न्यायालयाचा निर्णय
अल्पवयीन मुलीच्या न्यायासाठी आईचा आक्रोश; तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण..‘दोषींना अभय देता का?’ पीडित मातेचा प्रशासनाला सवाल
वशाल अग्रवाल यांना तो व्हिडिओ भोवणार


मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाच्या एका निरीक्षकाला लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे. एका व्यापार्‍याकडून तब्बल 10,000 रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात आणि जीएसटी विभागात एकच खळबळ उडाली आहे. जीएसटी नोंदणी क्रमांक देण्यासाठी एका अर्जदाराकडून 10,000 रुपयांची लाच घेताना एसाबीने जीएसटी अधिकार्‍याला पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने जीएसटी विभागातील एका राज्य कर निरीक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. या अधिकार्‍याचे नाव संदीप खलाटे असे आहे. संदीप हे माझगाव येथील जीएसटी विभागाच्या नोडल-7 मध्ये कार्यरत आहे.

COMMENTS