Homeताज्या बातम्यादेश

शिवमंदिरावर दरड कोसळून 14 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील घटना ; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

शिमला/वृत्तसंस्था ः हिमाचल प्रदेशातील शिमल्यामध्ये सोमवारी मोठी दुर्घटना घडली असून, समरहिल येथील शिव मंदिरावर मोठी दरड कोसळून 14 जणांचा मृत्यू झा

भारतात सात कोटी सत्तर लाख मधुमेही
एसटी चालकाने मुलीचा मृत्यूदेह नेला एसटी आगारात LOKNews24
ट्रॅक्टरच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू | LOKNews24

शिमला/वृत्तसंस्था ः हिमाचल प्रदेशातील शिमल्यामध्ये सोमवारी मोठी दुर्घटना घडली असून, समरहिल येथील शिव मंदिरावर मोठी दरड कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 दिवसांपासून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिमल्याच्या समरहिल परिसरात 14 ऑगस्टला भूस्खलनाची घटना घडली. या भूस्खलनामध्ये मातीचा ढिगारा याठिकाणी असलेल्या प्रसिद्ध शिव मंदिरावर पडला. त्यानंतर घटनास्थळावर एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कराचे जवान, स्थानिक पोलीस आणि होमगार्ड यांच्यामाध्यमातून बचावकार्य करण्यात आले. शिमल्याचे एसडीएम भानु गुप्ता यांनी सांगितले की, ढिगार्‍याखालून आतापर्यंत 14 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगार्‍याखाली 21 जणांचे मृतदेह असू शकतात. त्यापैकी गेल्या दोन दिवसांत 14 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एसडीएम भानु गुप्ता यांनी सांगितले की, शोध मोहीम सुरू आहे. 11 जणांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. तर इतर मृतदेहाची ओळख पटलेली नाही. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 7 जण बेपत्ता झाले आहेत. ते सापडत नसल्यामुळे नातेवाईक चिंतेत आहेत. हे सर्वजण शिव मंदिरामध्ये उपस्थित होते. मंदिरात पूजा सुरु असताना दरड कोसळली. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती आहे. श्रावण सोमवार असल्याने समरहिलच्या शिवमंदिरात सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची घटना घडली आणि सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मंदिरावर झाडांसह मोठा ढिगारा कोसळला. यामुळे हे मंदिर पूर्णपणे ढिगार्‍याखाली गाडले गेले. मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांना बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही.

COMMENTS