मकरध्वज शिक्षण संस्था संचलित ढेकणमोहा येथील,गोरक्षनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी संजय सोमनाथराव बडे पाटील यांची निवड झा

मकरध्वज शिक्षण संस्था संचलित ढेकणमोहा येथील,गोरक्षनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी संजय सोमनाथराव बडे पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
डोंगर पट्ट्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य सोमनाथरावजी बडे सर यांनी ढेकणमोहा या ठिकाणी गोरक्षनाथ विद्यालयाची सुरुवात केली होती त्यांच्या कारकिर्दीमध्ये शालेय क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केल्यामुळे शाळेचे नावलौकिक झाले तसेच हजारो विद्यार्थी डॉक्टर,इंजिनिअर,सैन्यदल,शिक्षक तसेच प्रशासकीय क्षेत्रामध्ये सर्विसला लागले होते त्यामुळे बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये या विद्यालयाचे अग्रगणने स्थान होते. त्यांचाच वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी श्री.संजय बप्पा बडे सर यांची पदोन्नती करून विद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड करण्यात आली आहे त्यांची निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सोमनाथरावजी बडे सर, माजी मुख्याध्यापक डी.एस.मुंडे सर तसेच सामाजिक कार्यकर्ते शाम राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी संजय बप्पा बडे यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कार्य घडेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS