Homeताज्या बातम्या

मुदखेड येथे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांची ४८६ वी जयंती उत्साहात साजरी

मुदखेड : राजपूत समाजाच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांची ४८६ वी जयंती बुधवारी मुदखेड शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सा

जयंती मिरवणुकीवरून वाद; तिघांना मारहाण, दोघांची प्रकृती गंभीरमाष्टी येथे घटना; 16 जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह गुन्हा, 11 जण अटकेत
बिलोली-धर्माबाद बसस्थानकांचा मराठवाड्यात अव्वल क्रमांक; ‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानात पटकावला मान
एससी प्रवर्गाचे उपवर्गीकरण करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या; लहुजी शक्ती सेनेची मागणी
मुदखेड येथे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांची ४८६ वी जयंती मोठ्या उत्साहात  साजरी - Lokmanthan | लोकमंथन

मुदखेड : राजपूत समाजाच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांची ४८६ वी जयंती बुधवारी मुदखेड शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक येथे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या शौर्य, पराक्रम, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमास मुदखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, सामाजिक कार्यकर्ते कैलास गोडसे, गंगाधर डांगे, शंकर राठी, गिरीश कोत्तावार, शिवानंद देवके, मुजीब पठाण, संदीप गाढे, सचिन चंद्रे, प्रमोद देशमुख कामनगावकर, सुनील चव्हाण, नितीन गोडसे, संजय चव्हाण, डॉ. संजय मुंगल, पत्रकार धम्मदत्त कांबळे, कान्होबा बिस्मिल्ले, साईनाथ नरडेले, शरद पवार, माजी सैनिक सुनील चौदंते, शेख बबलू, शेख माजीद, साजिद कुरेशी, पत्रकार हाफिज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रीतमसिंग ठाकूर, संतोषसिंग ठाकूर, ओमसिंग ठाकूर, तसेच सर्व राजपूत समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले. पिंटू ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS