Homeताज्या बातम्या

‘राहुरी कृषी विद्यापीठ’ आणि ‘आत्मा’चा नाशिक जिल्ह्यात संयुक्त उपक्रम

शेती बचाव अभियानांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात देवळाली प्रवरा : अखिल भारतीय एकात्मिक शेती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आ

रात्री डीजेवर बंदी; राहुरी पोलिसांची कठोर भूमिका 
शिर्डीत पुन्हा ‘लोखंडे पॅटर्न’? खा. वाकचौरेंच्या भूमिकेकडे लक्ष; ठाकरेंच्या विश्वासाला तडा जाणार?
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू थेट शेतकऱ्याच्या शेतात! राऊतवाडीतील ‘कोकण बहाडोली’ जांभूळ बाग ठरतेय अभ्यासाचा विषय

शेती बचाव अभियानांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

देवळाली प्रवरा : अखिल भारतीय एकात्मिक शेती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण व दिंडोरी तालुक्यातील विविध गावांमध्ये पीक विविधीकरण व शेती बचाव अभियानांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानांतर्गत तोरणमाळ, गोपाळपूर, वाडी बुद्रूक आणि करंजाळी या गावांमध्ये विविध कृषी प्रात्यक्षिके व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. प्रकल्पांतर्गत हळद, सफेद मुसळी, ओली शेंगेसाठी तूर, सोयाबीन, ग्राफ्टेड टोमॅटो तसेच करटोली या पिकांची प्रात्यक्षिके दाखवण्यात येत असून शेतकऱ्यांना आधुनिक, शाश्वत आणि उत्पन्नवाढीस पूरक अशा शेती तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाला पेठचे तालुका कृषी अधिकारी श्री. रहाणे, दिंडोरीचे तालुका कृषी अधिकारी भोये तसेच देवरे, पवार, महाले, वाघ आणि अन्य कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

तांत्रिक चर्चासत्रात प्रकल्प प्रमुख डॉ. उल्हास सुर्वे यांनी एकात्मिक, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. संतुलित खत व्यवस्थापनाद्वारे जमिनीचे आरोग्य जपण्याबरोबरच हळद लागवड तंत्रज्ञानाविषयी त्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तर डॉ. इक्बाल बागवान यांनी माती नमुना घेण्याच्या शास्त्रीय पद्धतींबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.

या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, नाशिकचे विभागीय सहसंचालक श्री. सुभाष काटकर तसेच प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तोरणमाळ, गोपाळपूर, वाडी बुद्रूक आणि करंजाळी या चारही गावांतील कार्यक्रमांना ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदविला.

COMMENTS