Homeताज्या बातम्या

वडिलांची वेगळी वाट, मुलाची उद्धव ठाकरेंना निष्ठेची ग्वाही; नांदेड विधानपरिषदेत आष्टीकर कुटुंबामुळे मतदारांमध्ये संभ्रम?

नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकरण विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर आष्टीकर कुटुंबातील राजकीय समीकरणे चर्चेचा विषय ठरली आहेत. हिंगोलीचे खासदार नागे

विधानपरिषदेसाठी उमेदवाराचा पेच वाढलाअर्ज दाखल करण्यासाठी उरले अवघे दोन दिवस
राज्यात शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ब्रेक?; विरोधी गटातील खासदारांवर मात्र लक्ष कायम
मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बीडमध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न
Krishna Patil Ashtikar Mva Candidate Uddhav Thackeray Decision After  Operation Tiger - बाप ने की बगावत बेटा है MLC चुनाव में UBT का उम्मीदवार,  कृष्णा पाटिल अष्टिकर पर क्या फैसला ...

नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकरण विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर आष्टीकर कुटुंबातील राजकीय समीकरणे चर्चेचा विषय ठरली आहेत. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क सुरू असतानाच, महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांनी आपण उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीसोबतच ठामपणे असल्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे वडील आणि मुलगा यांच्यातील वेगवेगळ्या राजकीय संदेशांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.

“मी उद्धव साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. माझ्यावर संशय घेण्याचे कारण नाही. मी कालही महाविकास आघाडीसोबत होतो, आजही त्यांच्यासोबतच आहे आणि पुढेही राहणार आहे. महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर ही निवडणूक जिंकण्याचा मला विश्वास आहे,” असे स्पष्ट वक्तव्य कृष्णा पाटील आष्टीकर यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना उत्तर देण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत. बदलत्या राजकीय घडामोडी आणि शिवसेनेतील अंतर्गत हालचालींमुळे त्यांचे नाव सातत्याने चर्चेत राहिले आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णा आष्टीकर यांना आपल्या निष्ठेबाबत खुलासा करण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, नांदेड विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने आपले अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांचा अर्ज मागे घेत कृष्णा आष्टीकर यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतांचे एकत्रीकरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, आष्टीकर कुटुंबाभोवती निर्माण झालेल्या राजकीय चर्चांमुळे काही मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, विधानपरिषदेसारख्या अप्रत्यक्ष निवडणुकांमध्ये उमेदवाराची राजकीय विश्वासार्हता आणि त्यामागील पक्षीय स्थैर्य याला विशेष महत्त्व असते. अशा वेळी एका बाजूला वडिलांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू असताना दुसर्‍या बाजूला मुलगा महाविकास आघाडीशी निष्ठा असल्याचा दावा करत असल्याने मतदारांमध्ये स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होऊ शकतात.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक सदस्यांमध्ये “अखेर आष्टीकर कुटुंबाची अंतिम राजकीय दिशा कोणती?” याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे कृष्णा आष्टीकर यांच्या स्पष्टीकरणामुळे संभ्रम दूर होईल की उलट चर्चा आणखी वाढतील, याबाबत राजकीय वर्तुळात मतमतांतरे आहेत. दरम्यान, कृष्णा आष्टीकर यांनी मात्र कोणत्याही अफवा किंवा चर्चांना महत्त्व न देता आपण महाविकास आघाडीच्या भूमिकेशी पूर्णपणे बांधील असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, वडिलांच्या संभाव्य राजकीय हालचाली आणि मुलाची जाहीर निष्ठा यामुळे नांदेड विधानपरिषद निवडणुकीत एक वेगळे राजकीय समीकरण तयार झाले असून, त्याचा अंतिम निकालावर कितपत परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS