Homeताज्या बातम्या

कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना नोकरी; शासकीय व नामांकित संस्थांमध्ये निवड

कर्जत : दादा पाटील महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची विविध शासकीय व रोजगार क्षेत्रातील पदांवर निवड झाली असून, महाविद्यालयाच्या यशस्वी परंपरेत आ

पारनेरमध्ये विशेष मार्गदर्शन शिबीर उत्साहात; विविध शासकीय योजनांची माहिती, दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभूवाडगाव–दहिगाव शे. पानंद रस्त्याची दुरुस्ती करा; ग्रामस्थांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
कौडगाव जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवबौद्ध व इतर नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

कर्जत : दादा पाटील महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची विविध शासकीय व रोजगार क्षेत्रातील पदांवर निवड झाली असून, महाविद्यालयाच्या यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या विविध भरती प्रक्रियेत ऋतुजा अनिल काळदाते हिची पोलीस शिपाई पदासाठी निवड झाली आहे. तसेच सुधीर भाऊसाहेब घालमे व कोमल शिवाजी बळे यांची ॲकव्हिजन बायोसायन्स, पुणे येथे असोसिएट पदासाठी निवड झाली आहे. प्रशांत सुभाष कदम यांची जे. जे. शासकीय रुग्णालय, मुंबई येथे लॅब सर्व्हंट पदावर, तर निशिगंधा गोरख भोसले हिची बृहन्मुंबई येथे कार्यकारी सहाय्यक पदासाठी निवड झाली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर यश संपादन करता येते, हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याचे कार्य ‘रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी’ आणि ‘रयत डिफेन्स अकॅडमी’च्या माध्यमातून सातत्याने केले जात असल्याचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षा व सरळ सेवा भरती परीक्षांकडे वळण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करून गौरव करण्यात आला.

या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अध्यक्ष आ. रोहित पवार, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, अंबादासजी पिसाळ, बप्पासाहेब धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, पालक व माजी विद्यार्थी संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात आले.

COMMENTS