Homeताज्या बातम्या

सहकारी बँकांसाठी नियमित व दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम काळाची गरज; सिमला येथील परिषदेत प्रा. भानुदास बेरड यांचे प्रतिपादन

अहिल्यानगर : बदलती आर्थिक धोरणे, तंत्रज्ञानातील प्रगती, नियामक संस्थांच्या सुधारित सूचना आणि ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे सहकारी बँकांसमोर

अहिल्यानगरमध्ये २७ मे पासून मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; हवामान अभ्यासक उत्तमराव निर्मळ यांचा अंदाज
युवतीसोबत गैरवर्तन; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, संशयित मुलगा ताब्यात
अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात लग्नकार्यासाठी नेलेले लाखो रुपयांचे दागिने हडप

अहिल्यानगर : बदलती आर्थिक धोरणे, तंत्रज्ञानातील प्रगती, नियामक संस्थांच्या सुधारित सूचना आणि ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे सहकारी बँकांसमोर नवी आव्हाने उभी राहत आहेत. या आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी बँकांचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियमित व दर्जेदार प्रशिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. भानुदास बेरड यांनी केले.

सिमला (हिमाचल प्रदेश) येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग ट्रेनिंग अँड सर्व्हिसेस’ (NIBTS) आणि ‘अभिनव बँकिंग एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’ यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील सहकारी बँकांसाठी आयोजित विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.

प्रा. बेरड पुढे म्हणाले की, देशातील सहकारी बँकिंग क्षेत्र हे ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. अशा प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), नाबार्ड (NABARD) आणि सहकार विभागाच्या नव्या धोरणांची व नियमांची सविस्तर माहिती मिळते. यामुळे बँकांचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सक्षम होण्यास मदत होते. याप्रसंगी अभिनव संस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा, सचिव शरद दळवी, एनआयबीटीएसचे संचालक भरत दळवी, योगेश शर्मा, ए. के. वशिष्ठ, गोपाल शर्मा यांच्यासह देशभरातील १२ सहकारी व जिल्हा मध्यवर्ती बँकांचे संचालक उपस्थित होते. तामिळनाडूच्या अतिरिक्त सहकार निबंधक इंदुमती यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत आयोजकांचे आभार मानले.

COMMENTS